दिवाळीच्या मुहूर्तावर अनेकांनी नवीन स्मार्टफोन खरेदी केले असतील. पण जर तुम्ही आता नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल, तर हा तुमच्यासाठी मोठा धक्का असणार आहे. मोबाईल फोनच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. सॅमसंग (Samsung) आणि शाओमी (Xiaomi) या आघाडीच्या स्मार्टफोन कंपन्यांनी त्यांच्या अनेक लोकप्रिय सिरिजच्या किंमती वाढवल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या मॉडेल्सवर तब्बल ४,००० ते ५,००० रुपयांपर्यंतची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता नवीन फोन खरेदी करण्यासाठी अधिक ख्रर्च करावा लागणार आहे.
सॅमसंग (Samsung) आणि शाओमी (Xiaomi) या दोन कंपन्यांनी 40 हून अधिक स्मार्टफोन मॉडेल्सच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. मॉडेल आणि स्टोरेजनुसार, या किंमतींमध्ये 1000 ते 5000 रूपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
सॅमसंग (Samsung) आणि शाओमी (Xiaomi) च्या किंमती वाढल्या
मिळालेल्या माहितीनुसार, सॅमसंग (Samsung) ने A आणि F सिरिजमध्ये 22 स्मार्टफोनच्या किंमती वाढवल्या आहेत. Xiaomi च्या Redmi Portfolio मधील 19 ची किंमत देखील वाढवली आहे. सॅमसंग फोनच्या किंमती 3.13 टक्क्यांपासून 9.52 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत, तर शाओमीच्या किंमतीमध्ये 4.26 टक्क्यांहून 18.75 वाढ झाली आहे. यानुसार, सॅमसंग गॅलेक्सी A07-5G चे दोन्ही सिरीज 2,000 ने महाग झाले आहेत. पूर्वी 4GB + 128BGB मॉडेल, 20,999 रूपयांना होता, जो आता 22,999 किंमतीमध्ये मिळणार आहे. गॅलेक्सी A57 चे काही सिरीज देखील 4,000 रूपयांनी महाग झाले आहेत. तर A36, A56 आणि A37 सिरीजच्या किंमतीमध्ये 2,000 रूपयांनी वाढ झाली आहे.
फोनचे दर का वाढले?
चिप्स आणि मेमरी या स्टोरेज कंपोनंट्सच्या वाढत्या किंमतीमुळे स्मार्टफोनच्या किंमती वाढल्या आहेत. या वाढीचा परिणाम Oppo, Vivo आणि Realme या कंपनीच्या फोनच्या किंमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Xiaomi ने दिवाळी दरम्यान ग्राहकांना ऑफर्स देण्यासाठी किंमतीमध्ये बदल केले नव्हते त्यामुळे आता ग्राहकांना याचा फटका बसणार आहे.
या फोनची किंमती सर्वाधिक वाढली
Xiaomi च्या रेडमी A7 प्रो 5G च्या किंमतीत सर्वाधिक वाढ केली आहे. पूर्वी हा फोन 15,999 किंमतीमध्ये होता. ज्याची किंमत आता 18,999 रूपये झाली आहे. रेडमी नोट 17 5G च्या अनेक सिरिजमध्ये 3,000 रूपयांनी वाढ झाली आहे आणि नोट 17 प्रो 5G सिरिजची किंमत 4,000 ने महाग झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.