Manasvi Choudhary
नोकरी, शिक्षण तसेच कामानिमित्त बाहेर राहण्यासाठी आपण घर भाड्याने घेतो. परंतु स्वतःच्या घराच्या तुलनेत भाड्याच्या घरामध्ये आपण आपल्याला हवे तसे बदल किंवा तोडफोड करू शकत नाही.
अशावेळी, घर भाड्याने घेण्यापूर्वीच वास्तुशास्त्राचे काही महत्त्वाचे नियम तुम्हाला माहित असणे महत्वाचे आहे. वास्तुशास्त्रानुसार, घर तपासून योग्य घराची निवड करणे तुमच्यासाठी महत्वाचे ठरू शकते.
भाड्याने घर घेण्यापूर्वी कोणत्या महत्वाच्या गोष्टी तपासणे महत्वाचे आहे ते जाणून घ्या.
वास्तुशास्त्रानुसार, घराचा मुख्य दरवाजा हा सकारात्मक ऊर्जेचे प्रवेशद्वार मानला जातो त्यामुळे भाड्याच्या घराचा मुख्य दरवाजा ईशान्य , पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा.
घर भाड्याने घेण्यापूर्वी घर व्यवस्थित तपासून घ्या. खराब झालेल्या व तुटलेल्या वस्तू दुरुस्त करून घ्याव्यात. वास्तुशास्त्रानुसार, घरात गळणारे नळ नसावेत, कारण आर्थिक अडचण वाढू शकते.
तुम्ही निवडत असलेल्या घराच्या भिंतींना, छताला किंवा मुख्य दरवाजाला तडे गेलेले नसावेत. वास्तुशास्त्रानुसार तडे गेलेल्या भिंती घरात नकारात्मक ऊर्जा पसरवतात, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याच्या आणि आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात.
वास्तुशास्त्रानुसार, अग्नी आणि जल ही दोन्ही तत्त्वे परस्परविरोधी आहेत. त्यामुळे घरामध्ये किचन आणि बाथरूम समोरासमोर असतील, तर असू नये कारण यामुळे घरात गंभीर वास्तुदोष निर्माण होऊ शकतात.
तुम्ही निवडत असलेले घर हे विहीर, मोठे मॅनहोल किंवा तळघरात नसावे. वास्तुशास्त्रानुसार अशा ठिकाणी राहिल्यास मानसिक अस्थिरता आणि आर्थिक संकट ओढू शकते.