Manasvi Choudhary
आजकाल महिला साड्या अनेक युनिक आणि हटके प्रकारे नेसतात. तुम्हालाही नेहमीच्या पॅटर्नपेक्षा वेगळा आणि युनिक लूक हवा असेल, तर तुम्ही सेलिब्रिटी स्टाईल जॅकेट लूक ट्राय करू शकता.
अनेक बॉलिवूड अभिनेत्री साडीसोबत जॅकेट परिधान करतात. एखाद्या लग्नकार्यासाठी, ऑफिस मीटिंगसाठी किंवा कॉकटेल पार्टीमध्ये हा लूक अत्यंत उठावदार दिसतो.
साडीवर जॅकेट घालण्याच्या 4 स्टायलिश आणि युनिक पद्धती कोणत्या आहेत ते पाहूया.
ऑफिस मीटिंग, कॉर्पोरेट इव्हेंट किंवा फॉर्मल लूकसाठी तुम्ही कॉटन, लिनन किंवा प्लेन सिल्क साडीवर ब्लेझर घालू शकता. हा लूक आकर्षक दिसण्यासाठी ब्लेझर घातल्यावर कमरेला एक स्लीक बेल्ट लावा.
जर तुम्हाला मॉडर्न आणि इंडोवेस्टर्न लूक करायचा असेल, तर ब्लाऊजऐवजी साडीवर स्टायलिश क्रॉप-टॉप घाला आणि त्यावर एखादे प्रिंटेड किंवा शॉर्ट जॅकेट परिधान करा.