Manasvi Choudhary
हिवाळ्यात थंडीच्या दिवसात आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती टिकवून राहण्यासाठी तुम्ही काही मोसमी फळांचा समावेश करू शकता.
जर तुम्हाला हिवाळ्यात हेल्दी राहायचे असेल आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज हवे असेल, तर तुमच्या आहारात 5 फळे नक्की खा.
संत्री हे व्हिटॅमिन सीयुक्त फळ आहे. हिवाळ्यात संत्री खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येते.
हिवाळ्यात पेरू खाल्ल्याने शरीराची पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. तसेच यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
हिवाळ्यात किवी खाल्ल्याने शरीरातील प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते आणि थकवा दूर होतो.
स्ट्रॉबेरीमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स त्वचेवरील सुरकुत्या कमी करतात आणि चेहऱ्याची त्वचा मऊ व चमकदार बनवतात.
हिवाळ्यात डाळिंब खाल्ल्याने शरीराचा फायदा होतो. डाळिंब रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही आणि त्वचा देखील चमकू लागते.
आहारात फळे तुम्ही स्मूदी, फ्रूट सॅलड्स आणि हेल्दी स्नॅक्सच्या स्वरूपात खाऊ शकता. यामुळे शरीराला झटपट ऊर्जा मिळेल.