Silver Price Today: चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण, २०००० रुपयांनी झाली स्वस्त; वाचा आजचे दर किती?

Silver Price Drop Today: चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. चांदी २०००० रुपयांनी स्वस्त झाली. आज चांदीचे दर किती आहेत ते घ्या वाचून...
Silver Price Today: चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण, २०००० रुपयांनी झाली स्वस्त; वाचा आजचे दर किती?
Silver Price TodaySaam Tv
Published On

Summary -

  • चांदीच्या दरात सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण

  • १ किलो चांदी २० हजार रुपयांनी स्वस्त झाली

  • गेल्या आठवड्यात चांदीने विक्रमी उच्चांक गाठला होता

  • दर घसरल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला

गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या दरात सतत वाढ होत होती. चांदीमध्ये आतापर्यंत विक्रमी वाढ झाली होती. पण आता चांदीच्या दरात घसरण होताना दिसत आहे. सलग चौथ्या दिवशी चांदीचे दर घसरले. आज सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली. १ किलो चांदी २० हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. त्यामुळे आज चांदीचे दागिने खरेदी करण्याची चांगली संधी आहे. जर आज तुम्ही चांदी खरेदी करण्यासाठी जाणार असाल तर तुमच्या शहरातील चांदीचे दर किती आहेत ते जाणून घ्या...

गेल्या महिनात चांदीच्या दरात अनेक वेळा वाढ झाली. चांदीच्या वाढत्या दरामुळे ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली होती. गेल्या आठवड्यात गुरूवारी चांदीच्या दराने उच्चांक गाठला होता. इतिहासात पहिल्यांदाच चांदीचे दर ४ लाखांवर गेले होते. त्यानंतर चांदीच्या दरात घट होताना पाहायला मिळाले. काल चांदीच्या दरात ५० हजार रुपयांनी घसरण झाली होती. तर आज चांदीच्या दरात २० हजारांनी घसरण झाली आहे.

Silver Price Today: चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण, २०००० रुपयांनी झाली स्वस्त; वाचा आजचे दर किती?
Silver Price Today: चांदीच्या दरात विक्रमी घसरण, ५०००० रुपयांनी झाली स्वस्त; तुमच्या शहरातील आजचे दर किती?

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात २० रुपयांनी घसरण झाली. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला २८० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर १ किलो चांदीचे दर तब्बल २०,००० रुपयांनी कमी झाले आहे. १ किलो चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला २,८०,००० रुपये खर्च करावे लागणार आहे. सोमवारी १ किलो चांदी ३,००,००० रुपयांना विकली गेली. चांदीचे दर कमी झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला. आज देशातील सर्वच शहरांमध्ये चांदीचे दर सारखेच आहेत.

Silver Price Today: चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण, २०००० रुपयांनी झाली स्वस्त; वाचा आजचे दर किती?
Silver Price and Investment: चांदीच्या दरात १७,००० रुपयांची मोठी घसरण; दर आणखी पडण्याची शक्यता, गुंतवणूकदारांनी काय करावे?

चांदीचे आजचे दर किती?

१ ग्रॅम चांदी - २८० रुपये

१० ग्रॅम चांदी - २८०० रुपये

१०० ग्रॅम चांदी - २८,००० रुपये

१००० ग्रॅम चांदी - २,८०,००० रुपये

Silver Price Today: चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण, २०००० रुपयांनी झाली स्वस्त; वाचा आजचे दर किती?
Gold Silver Rate 2026: आर्थिक संकट येणार, २०२६मध्ये सोने-चांदीच्या किमती घसरणार की वाढणार? बाबा वेंगांची भविष्यवाणी पुन्हा चर्चेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com