Gold Silver Rate 2026: आर्थिक संकट येणार, २०२६मध्ये सोने-चांदीच्या किमती घसरणार की वाढणार? बाबा वेंगांची भविष्यवाणी पुन्हा चर्चेत

Baba Vanga 2026 prediction: बाबा वेंगांच्या 2026 मधील आर्थिक संकटाच्या भविष्यवाणीमुळे सोने-चांदीच्या किमतींवर चर्चा वाढली असून, तज्ज्ञ या धातूंना सुरक्षित गुंतवणूक मानत आहेत.
Silver price outlook
Baba Vanga 2026 predictiongoogle
Published On

सध्या दोन ते तीन दिवसांपासून सोने-चांदीच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांना सगळ्यात जास्त आनंद झाला आहे. त्यातच भविष्यवक्त्या बाबा वेंगांची भाकीतं जगाला हादरवत आहेत. कारण यामध्ये जगाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो असं सांगण्यात आलं आहे. त्यांच्या भाकितानुसार जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात पैशांची टंचाई निर्माण होईल आणि त्यामुळे अनेक देशांची आर्थिक व्यवस्था कोलमडू शकते. या संकटाच्या काळात सोनं-चांदी आणि तांबं ही धातू सुरक्षित गुंतवणूक म्हणून महत्त्वाची ठरतील, असं बाबा वेंगांनी भाकीत केलं होतं.

बाबा वेंगा यांनी यापूर्वी चर्नोबिल दुर्घटनेसारख्या अनेक घटना होणार याची अचूक भाकीत केली होती. त्यामुळे त्यांच्या या भाकितांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलं गेलंय. काही अफवांनुसार येत्या काळात सोन्याच्या किमतींमध्ये 25 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. जर असं झालं, तर भारतात सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 2.11 लाख ते 2.43 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, जो आतापर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक असणार आहे.

Silver price outlook
Budget 2026: DMart तर ऐकलंय; पण She-Mart म्हणजे नेमकं काय रे भाऊ? ग्रामीण महिलांसाठी ठरणार वरदान

सध्या एमसीएक्सवर सोनं 1.69 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम दराने मिळत आहे. 2025 पासून सोन्याच्या किमतींमध्ये जवळपास 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. जागतिक स्तरावर अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करताना यामध्ये पाहायला मिळालं आहे. भारत दरवर्षी 100 टनांपेक्षा जास्त सोन्याची खरेदी करतो, ही बाबही सोन्याच्या किमती वाढण्यामागचं महत्त्वाचं कारण असू शकते.

तज्ज्ञांच्या मते, ईटीएफ गुंतवणुकीमुळे दिवाळी 2026 पर्यंत सोन्याचा दर 1.62 ते 1.82 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचू शकतो. बाबा वेंगांचं भाकीत खऱ्या अर्थाने जवळ येत असल्याचं चित्र दिसत आहे. चांदीच्या बाजारातही मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. सध्या चांदीचा दर अंदाजे 1.25 लाख रुपये प्रति किलो आहे. गेल्या आठवड्यात चांदीच्या किमतींमध्ये जवळपास 9 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती.

यावेळी चांदीने प्रति किलो 4 लाख 20 हजार 48 रुपयांचा उच्चांक गाठला होता, त्यानंतर दर काहीसे घसरून 3 लाख 99 हजार 893 रुपयांवर आले. त्याच दिवशी सोन्याच्या किमतीतही जवळपास 9 टक्क्यांची वाढ झाली होती. सोनं प्रति 10 ग्रॅम 1 लाख 80 हजार 779 रुपयांच्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचलं होतं, नंतर एमसीएक्सवर दर 1 लाख 69 हजार 403 रुपयांवर स्थिरावला. त्यामुळे येत्या काळात सोने आणि चांदी सुरक्षित पर्याय म्हणून जास्त महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असं बाजारतज्ज्ञांचं मत आहे. अशा परिस्थितीत बाबा वेंगांची 2026 मधील आर्थिक संकटाची भविष्यवाणी पुन्हा चर्चेत आली आहे.

Silver price outlook
Early Cancer Symptoms: महिनाभर आधी त्वचेवर दिसतील 'ही' कॅन्सरची लक्षणे, वेळीच व्हा सावध; डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com