Sakshi Sunil Jadhav
बजेट 2026 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ग्रामीण महिलांसाठी ‘She-Mart’ (Self-Help Entrepreneur Mart) या नव्या संकल्पनेची घोषणा केली आहे.
DMart जसं स्वस्त आणि विश्वासू खरेदीसाठी ओळखलं जातं, तसंच She-Mart हे ग्रामीण महिलांकडून चालवलं जाणारं आधुनिक रिटेल स्टोअर असेल.
She-Mart चे मालकी हक्क, व्यवस्थापन आणि दैनंदिन व्यवहार पूर्णपणे महिलांच्या हातात असतील.
आतापर्यंत 2 कोटींपेक्षा जास्त महिलांनी लखपती दीदी योजनेतून वार्षिक 1 लाख रुपये कमावले आहेत. She-Mart मुळे त्या थेट उद्योजक बनणार आहेत.
अनेक गावांमधील स्वयं-सहायता गट (SHG) एकत्र येऊन क्लस्टर पातळीवर She-Mart चालवतील.
या मार्टमध्ये सेंद्रिय भाजीपाला, हस्तकला, लोणची, पापड, मसाले, हस्तनिर्मित साबण या उत्पादनांची विक्री करता येईल.
ग्रामीण महिलांना उत्पादन तयार करूनही विक्रीसाठी बाजार मिळत नव्हता. She-Mart ही समस्या कायमची दूर करणार आहे.
She-Mart साठी महिलांना इनोव्हेटिव्ह फायनान्सिंग अंतर्गत कमी व्याजदरात कर्ज आणि सरकारी अनुदान दिलं जाणार आहे.
सरकारचा उद्देश 2027 पर्यंत 3 कोटी लखपती दीदी घडवण्याचा असून She-Mart ही त्यामधली महत्त्वाची माहिती ठरणार आहे.
महिलांच्या हातात थेट उत्पन्न आल्याने कुटुंबाचे पोषण, मुलांचे शिक्षण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.