Silver Price Today: चांदीच्या दरात विक्रमी घसरण, ५०००० रुपयांनी झाली स्वस्त; तुमच्या शहरातील आजचे दर किती?

Silver Prices Crash: सोन्यापाठोपाठ आज चांदीच्या दरात विक्रमी घसरण झाली आहे. १ किलो चांदी ५०००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. आज तुमच्या शहरात चांदीचे दर किती आहेत? ते घ्या जाणून...
Silver Price Today: चांदीच्या दरात विक्रमी घसरण, ५०००० रुपयांनी झाली स्वस्त; तुमच्या शहरातील आजचे दर किती?
Silver PriceSaam Tv
Published On

Summary -

  • सलग तिसऱ्या दिवशी चांदीच्या दरात मोठी घसरण

  • १ किलो चांदी ५०,००० रुपयांनी स्वस्त

  • १ ग्रॅम चांदीचा दर ३०० रुपये झाले

  • ग्राहकांसाठी चांदी खरेदीची चांगली संधी

चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सलग तिसऱ्या दिवशी चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. १ किलो चांदी ५० हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. त्यामुळे आज चांदीचे दागिने खरेदी करण्याची चांगली संधी आहे. आज तुमच्या शहरातील चांदीचे दर किती आहेत ते आपण जाणून घेणार आहोत...

गेल्या आठवड्यात गुरूवारी चांदीच्या दराने उच्चांक गाठला. इतिहासात पहिल्यांदाच चांदीचे दर ४ लाखांपार गेले होते. त्यानंतर चांदीच्या दरात घसरण होताना दिसत आहेत. रविवारी अर्थसंकल्पाच्या दिवशी देखील चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी १ किलो चांदीच्या दरात ५० हजार रुपयांनी घसरण झाली.

Silver Price Today: चांदीच्या दरात विक्रमी घसरण, ५०००० रुपयांनी झाली स्वस्त; तुमच्या शहरातील आजचे दर किती?
Silver Earrings Design: सिल्वर कानातल्यांचा भलताच ट्रेंड, हे आहेत 5 लेटेस्ट कानातले डिझाईन्स

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात ५० रुपयांनी घसरण झाली. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला ३०० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर १ किलो चांदीचे दर तब्बल ५०,००० रुपयांनी कमी झाले आहे. १ किलो चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला ३,००,००० रुपये खर्च करावे लागणार आहे. रविवारी १ किलो चांदी ३,५०,००० रुपयांना विकली गेली. आज दर कमी झाल्यामुळे चांदी खरेदी करताना तुमच्या खिशाला कात्री लागणार नाही.

Silver Price Today: चांदीच्या दरात विक्रमी घसरण, ५०००० रुपयांनी झाली स्वस्त; तुमच्या शहरातील आजचे दर किती?
Gold And Silver Rate : २४ तासांत सर्वात मोठी घसरण! सोनं ₹३०००० तर चांदी १ लाखांनी घसरली, नाता सुवर्णनगरीतील ताजे दर

आज चांदीचे दर देशातील मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, कोलकाता, हैदराबाद, केरळ या प्रमुख शहरामध्ये सारखेच आहेत. या शहरांमध्ये चांदीचे दर ३००००० रुपये १ किलो तर ३०० रुपये १ ग्रॅम इतकेच आहेत. या शहरांमध्ये देखील चांदीचे दर गेल्या काही दिवसांपासून खूप वाढले होते. त्यामुळे ग्राहकांनी चांदी खरेदीकडे पाठ फिरवली होती. पण आता दर कमी झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

चांदीचे आजचे दर किती?

१ ग्रॅम चांदी - ३०० रुपये

१० ग्रॅम चांदी - ३००० रुपये

१०० ग्रॅम चांदी - ३०,००० रुपये

१००० ग्रॅम चांदी - ३,००,००० रुपये

Silver Price Today: चांदीच्या दरात विक्रमी घसरण, ५०००० रुपयांनी झाली स्वस्त; तुमच्या शहरातील आजचे दर किती?
Gold Silver Rate Today: अर्थसंकल्पाआधीच गुडन्यूज! सोनं ₹१३००० तर चांदी २७००० रुपयांनी घसरली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com