Silver Price and Investment: चांदीच्या दरात १७,००० रुपयांची मोठी घसरण; दर आणखी पडण्याची शक्यता, गुंतवणूकदारांनी काय करावे?

Silver Price and Investment: आज चांदी बाजारात रेकॉर्ड उच्चांक गाठल्यानंतर किंमतींमध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. चांदीची किंमत सुमारे 17,000 ने घसरली, यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
Silver Price
Silver PriceSaam Tv
Published On

Silver Price and Investment: चांदीच्या दरांनी मागील काही दिवसांत विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर आता अचानक मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज (MCX) वर चांदीचे दर तब्बल 17 हजार रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे बाजारात खळबळ उडाली आहे. या घसरणीमुळे शॉर्ट-टर्म गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली असून, दीर्घकालीन गुंतवणूकदार मात्र परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहेत.

चांदीचा दर

चांदीच्या किमतीत सध्या जोरदार घसरण दिसून येत आहे. 31 जानेवारी 2026 रोजी MCX वायदा बाजारात चांदीचा भाव 2,65,652 प्रति किलो इतका होता. आज 2 फेब्रुवारी 2026ला चांदीच्या भावात अजून घसरण झाली आहे. म्हणजे, आज चांदीचा भाव अंदाजे 2,25,000–2,30,000 प्रति किलो झाले आहे.

Silver Price
Tighee: आई–मुलीच्या नात्याचा प्रवास सांगणारं सोनू निगमचं गाणं प्रदर्शित; 'तिघी'मधील 'हास जराशी' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

चांदीच्या किंमतीत घसरण का झाली?

आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदीच्या किमतीत दबाव दिसत आहे. अमेरिकेतील व्याजदर धोरण, डॉलरची मजबुती आणि आर्थिक आकडेवारी यामुळे मौल्यवान धातूंवर परिणाम झाला आहे. परिणामी, देशांतर्गत बाजारातही चांदीचे दर घसरले.

गुंतवणूकदारांनी काय करावे?
बाजार विश्लेषकांच्या मते, अल्पकालीन व्यापाऱ्यांनी सध्या जपून पावले टाकावीत. चांदीमध्ये चढ-उतार अधिक असल्याने योग्य ‘स्टॉप लॉस’ लावणे महत्त्वाचे आहे. दर अजून काही काळ अस्थिर राहण्याची शक्यता असल्याने घाईघाईने मोठी गुंतवणूक टाळण्याचा सल्ला दिला जात आहे.

Silver Price
Grammy Awards 2026: ९० व्या वर्षी दलाई लामांनी जिंकला पहिला 'ग्रॅमी पुरस्कार'; पाहा विजेत्यांची यादी

दुसरीकडे, दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही घसरण संधी ठरू शकते, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. चांदीचा दीर्घकालीन ट्रेंड अद्याप सकारात्मक असल्याने, टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केल्यास भविष्यात फायदा होऊ शकतो. मात्र, संपूर्ण भांडवल एकाच वेळी गुंतवण्याऐवजी विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक करून जोखीम कमी करण्याचा सल्ला दिला जात आहे.

एकूणच, चांदीच्या दरातील ही मोठी घसरण बाजारासाठी महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. येत्या काळात जागतिक घडामोडी, औद्योगिक मागणी आणि आर्थिक धोरणे यावर चांदीच्या दरांची दिशा अवलंबून राहणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी भावनांच्या भरात निर्णय न घेता, तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि योग्य प्लॅनिंगने गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com