SBI Bank : SBI खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी; १ ऑक्टोबरपासून कॅश विड्रॉलचे नवे नियम, ग्राहकांना भुर्दंड

SBI Bank New Rules Update News : SBI ने BSBD खातेदारांसाठी कॅश विड्रॉलचे नवे नियम जाहीर केले आहेत. १ ऑक्टोबर २०२६ पासून चार व्यवहारांनंतर ₹१५ अधिक GST शुल्क आकारले जाणार आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती.
SBI Bank Cash Withdrawl New Rules
SBI Bank Cash Withdrawl New Rules Saam Tv
Published On
Summary
  • १ ऑक्टोबर २०२६पासून SBI चे नवे नियम लागू

  • BSBD खातेदारांसाठी कॅश विड्रॉलचे नवे नियम

  • महिन्यातील पहिल्या चार कॅश व्यवहारांनंतर ₹१५ अधिक GST शुल्क आकारले जाणार

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने बेसिक सेविंग्स बँक डिपॉझिट (BSBD) खातेदारांसाठी कॅश विड्रॉलशी संबंधित नियमांमध्ये बदल केला आहे. हे नवे नियम १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणार आहेत. त्यामुळे BSBD खाते असलेल्या ग्राहकांनी या बदलाची माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

काय आहेत नवे नियम?

SBI च्या नव्या नियमांनुसार, महिन्यातील पहिल्या चार कॅश विड्रॉलनंतर होणाऱ्या प्रत्येक रोख व्यवहारासाठी १५ रुपये अधिक GST शुल्क आकारले जाणार आहे. यापूर्वी पहिल्या चार मोफत व्यवहारांची गणना करताना डिजिटल व्यवहारांचा समावेश केला जात नव्हता. मात्र, आता ही सूट काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांनी महिन्यात केलेल्या व्यवहारांची संख्या लक्षात ठेवणे गरजेचे ठरणार आहे.

SBI Bank Cash Withdrawl New Rules
Hair Care : केसांमधील कोंड्यावर सापडला ५ रुपयांचा उपाय, खोबरेल तेलात मिसळा, एका झटक्यात नाहीसा होईल स्कॅल्पचा त्रास

BSBD खात्याची खास वैशिष्ट्ये

BSBD खाते प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. या खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नसते. या खात्यासोबत चेकबुकची सुविधा उपलब्ध नसते. मात्र, पैसे काढण्यासाठी ग्राहक ब्रांचमध्ये विड्रॉल फॉर्मचा वापर करू शकतात. याशिवाय ATM द्वारेही पैसे काढता येतात. खातेदाराला बेसिक RuPay ATM-कम-डेबिट कार्ड दिले जाते.

SBI Bank Cash Withdrawl New Rules
Rain Alert : महाराष्ट्रात विजांसह वादळी पाऊस ; ४ जिल्ह्यांना येलो अलर्ट, वाचा हवामानाचा अंदाज

खाते उघडण्यासाठी महत्त्वाची अट

BSBD खाते उघडणाऱ्या ग्राहकाकडे दुसरे सेव्हिंग्स बँक खाते असता कामा नये. एखाद्या ग्राहकाकडे आधीपासून सेव्हिंग्स खाते असल्यास, BSBD खाते उघडल्यानंतर ३० दिवसांच्या आत जुने सेव्हिंग्स खाते बंद करावे लागते.

SBI Bank Cash Withdrawl New Rules
Medicine Short Form : औषधाच्या पाकिटावर लिहिलेल्या AC, OD, BD, TD, QID, SOS या शॉर्टफॉर्मचे अर्थ काय? जाणून घ्या

कोणत्या सेवा मोफत?

BSBD खातेदारांना बेसिक RuPay ATM-कम-डेबिट कार्ड मोफत दिले जाते आणि त्यासाठी वार्षिक मेंटेनन्स शुल्क आकारले जात नाही. NEFT आणि RTGS सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून खात्यात पैसे जमा केल्यास त्यावरही शुल्क आकारले जात नाही. तसेच इनएक्टिव्ह खाते पुन्हा सुरू करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. मात्र, खाते बंद करताना शुल्क लागू होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com