Rent VS Buy Home Calculator: ₹३०००० भाडे की ₹७०००० चा हप्ता? महागाईत घर विकत घ्यावं की भाड्याने राहावं? कोणता पर्याय आहे योग्य

Financial Planning: महागाईच्या काळात ₹३०,००० भाडे की ₹७०,००० EMI यामधील योग्य पर्याय कोणता? भाडे व घर खरेदीचे फायदे, तोटे आणि आर्थिक नियोजन समजून घ्या.
Rent VS Buy Home Calculator
Rent VS Buy Home Calculatorgoogle
Published On

सध्या महागाईच्या काळात घर घेणं हे सर्व सामान्यांचं स्वप्नच राहीलं आहे. करोडोंशिवाय कमी रक्कमेत घर मिळणं सध्या अशक्यच झालंय. मग काही मंडळी घर विकत घेण्यापेक्षा भाड्याच्या घरात राहण्याचा निर्णय घेतात. यामध्ये दरमहिन्याला ठरलेली रक्कम मालकाला दिली जाते आणि तिथे राहता येतं.

बऱ्याचदा तुम्हाला हे घर मालकाच्या म्हणण्यानुसार सोडावं लागतं. पण काही मंडळी भाड्याने घर विकत घेण्यापेक्षा घर विकत घेऊन त्याचा हप्ता भरतात. पण भाड्याच्या घरात तुम्हाला कमी पैसे द्यावे लागतात, तर विकतच्या घरामध्ये तुम्हाला जास्त पैशांचा हप्ता भरावा लागतो. यामध्ये अनेकांचा गोंधळ निर्माण होतो. पुढील माहितीत आपण याचबद्दल जाणून घेणार आहोत.

भाड्याने राहण्याचे फायदे

भाड्याने राहण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सोयीस्कर राहणं. यामध्ये तुम्ही तुमच्या नोकरी किंवा गरजेनुसार जागा सहज बदलू शकता. ३०,००० रुपयांचं भाडे ईएमआयपेक्षा कमी असल्यामुळे, उरलेले पैसे गुंतवता येतात किंवा वाचवता येतात. यामध्ये तुम्हाला मालकाला फक्त भाडे द्यावे लागते. इतर मालमत्ता कर तुम्हाला भरावे लागत नाहीत.

Rent VS Buy Home Calculator
Raigad Top 10 Places: उन्हाळ्याच्या सुट्टीत रायगडजवळील ही TOP 10 ठिकाणं नक्की पाहा, हिरव्यागार निसर्गात जाल हरवून

घर खरेदी करण्याचे फायदे

घर खरेदी केल्यामुळेही अनेक समस्या सुटतात. एक कायमस्वरूपी मालमत्ता किंवा हक्काची जागा निर्माण होते. ₹७०,००० चा ईएमआय जास्त वाटत असला तरी, ही एक अशी गुंतवणूक आहे जी भविष्यात तुमची संपत्ती वाढवते. जे तुम्हाला भाड्याच्या घरामध्ये मनासारखं आणि हक्काने पाहिजे तितके दिवस राहता येत नाही.

पैशांचे गणित समजून घ्या

जर EMI तुमच्या उत्पन्नाच्या ३० ते ४०% पेक्षा जास्त असेल, तर ते तुमच्या बजेटवर ताण आणू शकतं. पण कमी भाड्यामुळे तुम्हाला बचत आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून चांगला परतावा मिळू शकतो. तसेच, मालमत्तेचतही वाढ होते आणि भविष्यात तुम्हाला सेविंग करता येते. हे पूर्णपणे तुमच्या उत्पन्नावर, नोकरीच्या स्थिरतेवर आणि भविष्यातील प्लानिंगवर अवलंबून आहे. जर तुम्ही एकाच शहरात अनेक वर्षे राहण्याचा विचार करत असाल आणि तुमचं उत्पन्न स्थिर असेल, तर घर विकत घेणं हा एक चांगला पर्याय असू शकतो. समजा, तुम्हाला एका ठिकाणी राहायचं नसेल, जॉब पक्का नसेल तर तर तुम्ही भाड्याच्या घरात राहण्याचा पर्याय निवडावा.

Rent VS Buy Home Calculator
8th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! ८व्या वेतन आयोगात ₹50,000 बेसिक सॅलरीची शक्यता, काय आहेत नेमक्या मागण्या?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com