

आठव्या वेतन आयोगाकडे शिक्षकांची पगार वाढीची मागणी
कर्मचाऱ्यांची बेसिक पगार ५०,००० ते ६०,००० असावा अशी मागणी
भरपगारी रजा वाढवण्याची मागणी
८व्या वेतन आयोगासंदर्भात क्रेंद्रीय सरकारी शिक्षक मोठ्या प्रमाणात मागण्या करत आहेत. युनियन टेरिटरी (UT) शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटना (Pragatisheel Shikshak Nyaya Manch) ने सरकाराकडे अनेक मागण्यांचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यामध्ये वेतनवाढीपासून ते निवृत्तीवेतनापर्यंत अनेक मोठ्या बदलांची मागणी केली आहे.
शिक्षक संघटनेची प्रमुख मागणी म्हणजे पहिल्या स्थरावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ही ५०,००० ते ६०,००० पर्यंत असावी. याचा फिटमेंट फॅक्टर २.६२ हा वाढवून ३.८३ करावा. ७ व्या वेतन आयोगामध्ये बेसिक सॅलरी १८,००० होती तर फिटमेंट फॅक्टर २.५७ होता. तर याची वार्षिक वाढ ही फक्त ३ टक्के इतकी होती. म्हणजेच आता जर या नव्या मागण्या स्विकारल्या गेल्या तर हा सगळ्यात मोठा बदल झालेला पाहायला मिळेल.
PSNMने वार्षिक वेतनवाढ ६% ते ७% पर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. कारण, जेव्हा महागाई भत्ता (DA) ५०% पर्यंत पोहोचेल, तेव्हा तो मूळ वेतनात जोडला जाईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगार वाढी लवकरात लवकर होईल.
शिक्षकांनी भत्त्यांमध्ये घरभाडे भत्त्यात (HRA)वाढ करण्याचीही मागणी केली आहे. आता १०%, २०% आणि ३०% वरून १२%, २४% आणि ३६% पर्यंत भत्ता वाढवावा अशी त्यांची मागणी आहे. तसेच वाहतूक भत्ता किमान ९,००० रुपये, इंटरनेट आणि एआय (AI) सपोर्टसाठी दर महिना २,००० च्या डिजिटल भत्त्याची मागणी केली आहे.
सुट्ट्यांच्या बाबतीतही मोठे बदल व्हावेत असे शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामध्ये कॅज्युअल लीव (Casual Leave -CL) ३० दिवस भरपगारी रजा असावी ही महत्वाची मागणी केली आहे. तसेच इनकॅशमेंट ३०० पासून वाढवून ४०० दिवस करण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे. तर ग्रॅच्युटी २५ लाख रुपयांवर ५० लाख करावा अशा सगळ्या मागण्या शिक्षकांनी केल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.