8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: बेसिक सॅलरी ₹७२०००, फिटमेंट फॅक्टर ४ पटीने वाढणार? किती होणार सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार? वाचा

8th Pay Commission Salary Hike Update: आठव्या वेतन आयोगासाठी कर्मचाऱ्यांनी काही मागण्या केल्या आहे. या मागण्यांमध्ये फिटमेंट फॅक्टर ४.० करण्याची मागणी करण्यात आली आहे. यानुसार बेसिक सॅलरी ७२००० रुपये होऊ शकते.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगासंदर्भात कर्मचाऱ्यांच्या मागण्या

फिटमेंट फॅक्टर ४.० करण्याची मागणी

बेसिक सॅलरी ७२००० रुपये होणार?

आठव्या वेतन आयोगात पगारवाढ किती मिळणार याकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आठव्या वेतन आयोगासाठी कर्मचाऱ्यांना सूचना देण्यास सांगितले आहे. या सूचनांच्या मदतीने शिफारसी तयार करण्यासाठी मदत होईल. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी आठव्या वेतन आयोगसमोर काही प्रस्तान ठेवले आहेत. यामध्ये पगारवाढीची अपेक्षा आहे.

भारतीय प्रतिरक्षा कामगार संघाने (BPMS)ने किमान वेतनवाढ, फिटमेंट फॅक्टर आणि वार्षिक वेतनवाढीबाबत सूचना दिल्या आहे. या मसूद्यामध्ये किमान वेतन हे केवळ खर्च आणि गरजेचे आधारित नसावे. ते राष्ट्रीय उत्पन्नाशी जोडणे अधिक महत्त्वाचे आहे, असं सांगण्यात आले आहे.

फॅमिली युनिटमध्ये वाढ करण्याची मागणी

कर्मचाऱ्यांची मागणी आहे की, फॅमिली युनिटमध्ये बदल करावा. सातव्या वेतन आयोगात ३फॅमिली युनिट आहे. यामध्ये बदल करुन २ फॅमिली युनिट करण्याची मागणी केली जात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल.

बेसिक सॅलरी ७२००० होणार? (8th Pay Commission Salary Hike to 72000 Rupees)

कर्मचारी संघटनांनी बेसिक सॅलरी ७२००० रुपये करण्याची मागणी केली आहे. फिटमेंट फॅक्टर ४.० करन बेसिक सॅलरीत वाढ करण्याची मागणी केली आहे. म्हणजेच फिटमेंट फॅक्टरमध्ये जवळपास ४ पटीने वाढ करण्याची मागणी केली जात आहे. याआधी सहाव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर १.८६ होता. सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ होता. त्यानंतर आता फिटमेंट फॅक्टर ४.० करण्याची मागणी केली जात आहे.

वार्षिक पगारवाढ (Annual Increment)

मसुद्यानुसार, वार्षिक पगारवाढीमध्येही वाढ करण्याची मागणी केली जात आहे. अॅन्युअल इंक्रिमेंट ३ टक्क्यांवरुन ६ टक्के करण्याची मागणी केली जात आहे. ३ टक्के पगारवाढ ही पुरेशी नाही. महागाईत वाढ, खर्चात वाढ आणि सध्याचे उत्पन्न मर्यादित नाही, यामुळे वार्षिक पगारवाढीत वाढ करण्याची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हिंगोली बाजार समिती बंद करण्याची प्रशासनावर वेळ

बापानंतर मुलाचा कारनामा; कारच्या बोनेटवर उभं राहून विरोधकांना अश्लील शिवीगाळ

Maharashtra Transport : सर्व वाहनांसाठी मराठी सक्ती लागू होणार; फडणवीस सरकार मोठा निर्णय घेणार, मसुदाही तयार

Cholesterol Risk: औषधं थांबवण्याची चूक करू नका! कोलेस्ट्रॉल वाढल्यास वाढतो हार्ट अटॅकचा धोका

Bigg Boss Marathi 6 Winner : "मी त्याच्याशी लग्न करणार..."; 'बिग बॉस मराठी ६' विजेती तन्वी कोलतेने वैयक्तिक आयुष्याबद्दल केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT