

भारत पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी
विविध पदांसाठी भरती सुरु
पगार मिळणार १.४ लाखांपर्यंत
BPCL Recruitment: चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी.भारत पेट्रोलियममध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. कंपनीत सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह, सेक्रेटरी आणि असोसिएट एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.
भारत पेट्रोलियममध्ये एकूण २५० पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचे आहे. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी तुम्हाला www.bharatpetroleum.in वर जाऊन अर् करायचा आहे.
भारत पेट्रोलियममधील नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १८ एप्रिलपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मे २०२६ आहे. त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करायचा आहे. ज्युनिअर इक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी सर्वाधिक जागा रिक्त आहेत. एकूण १७५ पदांसाठी भरती होणार आहे. याचसोबत विविध विभागांमध्ये भरती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पदासाठी मॅकेनिकल/इलेक्ट्रिकल/इंस्ट्रूमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/सिविल/केमिकल इंजिनियरिंमध्ये डिप्लोमा केलेले असावा. याचसोबत ५ वर्षांचा अनुभाव असायला हवा. ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह अकाउंट्स पदासाठी इंटर सीए, इंटर सीएमएसोबत ग्रॅज्युएशन केलेले असावे.सेक्रेटरी पदासाठी १०वी १२वी पास असायला हवे. याचसोबत ३ वर्षांची बॅचरल डिग्री केलेली असायला हवी.क्वालिटी अश्युरन्स असोसिएट एक्झिक्युटिव्ह पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.एससी केलेले असावे.
पगार
भारत पेट्रोलियममधील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड अॅप्लिकेशन स्क्रिनिंग, अनुभव, शैक्षणिक पात्रता, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, केस बेस्ड डिस्कशन, ग्रुप टास्क आणि पर्सनल इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह आणि सेक्रेटरी पदासाठी निवड झाल्यावर ३०,००० ते १,२०,००० रुपये पगार मिळणार आहे. असोसिएट एक्झिक्युटिव्ह पदासाठी ४०,००० ते १,४०,००० रुपये पगार मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.