CRPF Recruitment: खुशखबर! CRPF मध्ये ९,१७५ पदांसाठी बंपर भरती; अर्ज कसा करावा?

CRPF Recruitment 2026: सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे, सीआरपीएफमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचा आहे.
CRPF Recruitment
CRPF RecruitmentSaam Tv
Published On
Summary

CRPF मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

कॉन्स्टेबल पदासाठी भरती

९,१७५ पदांसाठी भरती केली जाणार

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दल म्हणजेच CRPF मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. CRPF मध्ये कॉन्स्टेबल पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

CRPF Recruitment
Desk Job Risks: 8 तास डेस्क जॉब केल्याने तरुणांमध्ये वाढतोय 'हा' आजार, आताच करा हे बदल, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

सीआरपीएफमधील या भरतीद्वारे एकूण ९ हजार पदे भरली जाणार आहे. या भरतीसाठी सध्या अर्जप्रक्रिया सुरु करण्यात आलेली नाही. लवकरच भरती केली जाईल. या नोकरीसाठी अर्ज कुठे अन् कसा करावा याबाबत माहिती जाणून घ्या.

सीआरपीएफमधील कॉन्स्टेबल पदासाठी भरती २० एप्रिलपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ मे २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्याआधी अर्ज करायचा आहे.

सीआरपीएफमधील भरती मोहिमेत एकूण ९,१७५ पदे भरली जाणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी ९०९६ जागा रिक्त आहेत. महिला उमेदवारांसाठी ७९ पदे भरली जाणार आहे.

पात्रता

सीआरपीएफमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत टेक्निलक फील्डमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. आयटीआय प्रमाणपत्र आणि फील्डमध्ये काम केलेले असावे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आधी वेबसाइटवर जाऊन सर्व माहिती वाचा.

CRPF Recruitment
Government Job: परीक्षा नाही थेट सरकारी नोकरी; पॅकेज २१ लाख रुपये; पात्रता अन् अर्जप्रक्रिया वाचा

अर्ज कसा करावा? (CRPF Recruitment Application Process)

सर्वात आधी तुम्हाला सीआरपीएफच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

यानंतर तुम्हाला होमपेजवर LBO भरतीवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे.

यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज भरायचा आहे. महत्त्वाची माहिती भरा.

यानंतर फॉर्म सबमिट करा. त्यानंतर फॉर्मची प्रिंट आउट काढून ठेवा.

CRPF Recruitment
Professional Cuddler Job: मार्केटमध्ये आलाय नवीन जॉब, मिठी मारा अन् लाखो रूपये कमवा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com