Pune: ड्युटीवर जातो म्हणत घराबाहेर गेले, फोनही बंद ठेवला अन् सीआरपीएफ जवान प्रशांत कदम यांचा अपघातात मृत्यू

CRPF Jawan Prashant Kadam Death: तळेगाव दाभाडे येथील सीआरपीएफ जवान प्रशांत कदम यांचा पुण्यातील अपघातात मृत्यू झाला. बेपत्ता तक्रार आणि अनोळखी मृतदेहाची नोंद एकाच ठाण्यात असूनही ओळख पटण्यास झालेल्या विलंबामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
CRPF jawan Prashant Kadam, a resident of Talegaon Dabhade, who died in a tragic road accident near Somatane Fata in Pune.
CRPF jawan Prashant Kadam, a resident of Talegaon Dabhade, who died in a tragic road accident near Somatane Fata in Pune.Saam Tv
Published On

दिलीप कांबळे, साम टीव्ही

पुणे (तळेगाव): सीआरपीएफमध्ये गांधीनगर (गुजरात) येथे कार्यरत असलेले तळेगाव दाभाडे येथील जवान प्रशांत कदम यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. २५ मार्च रोजी घरातून ड्युटीवर जात असल्याचे सांगून बाहेर पडलेले प्रशांत कदम यांचा मृतदेह काही तासांतच सापडला. मात्र, ओळख पटण्यास विलंब झाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

CRPF jawan Prashant Kadam, a resident of Talegaon Dabhade, who died in a tragic road accident near Somatane Fata in Pune.
Pune : कारवाई कमी अन् कर्मचाऱ्याची "हवा"च जास्त, पुणे महापालिकेच्या रिलस्टारची जोरदार चर्चा

मिळालेल्या माहितीनुसार, २५ मार्च रोजी प्रशांत कदम घरातून निघाल्यानंतर लोणावळा येथून परत तळेगावच्या दिशेने आले. यावेळी त्यांनी कोणालाही काहीही न सांगता फोनही बंद ठेवला होता. त्याच रात्री सोमाटणे फाटा परिसरात हॉटेल अंगणसमोर रस्ता ओलांडताना एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने पिंपरी-चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलवण्यात येत होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात अनोळखी मृतदेह अशी नोंद करण्यात आली होती.

CRPF jawan Prashant Kadam, a resident of Talegaon Dabhade, who died in a tragic road accident near Somatane Fata in Pune.
त्वचेचे कण, केस, पेढे अन्..; अशोक खरातच्या ऑफिसमध्ये काय सापडलं? काळ्या काचेचीही तपासणी

दरम्यान प्रशांत कदम बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात नोंदवली होती. दोन ते तीन दिवस कुटुंबीय आणि पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता. विशेष म्हणजे एकीकडे बेपत्ता तक्रार आणि दुसरीकडे अनोळखी मृतदेहाची नोंद एकाच पोलीस ठाण्यात असूनही त्वरित पडताळणी न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. नंतर पोलिसांनी तपास करून मृत व्यक्तीची ओळख प्रशांत कदम अशी पटवून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. आज त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

CRPF jawan Prashant Kadam, a resident of Talegaon Dabhade, who died in a tragic road accident near Somatane Fata in Pune.
Maharashtra Weather: मुंबईसह राज्यात पाऊस कोसळणार, वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता; २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट

या घटनेनंतर तळेगाव दाभाडे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी अधिक तत्परतेने कारवाई केली असती तर ओळख लवकर पटली असती अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. पोलिसांच्या हलगर्जीपणाबाबतही दबक्या आवाजात नाराजी व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com