त्वचेचे कण, केस, पेढे अन्..; अशोक खरातच्या ऑफिसमध्ये काय सापडलं? काळ्या काचेचीही तपासणी

Ashok Kharat Forensic Investigation Nashik Details: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात फॉरेन्सिक तपासात धक्कादायक पुरावे समोर आले आहेत. केस, त्वचेचे कण, पेढे आणि औषधांची बाटली जप्त करण्यात आली असून SIT तपास अधिक तीव्र झाला आहे.
Forensic team inspects Ashok Kharat’s office in Nashik, collecting crucial evidence during the probe.
Forensic team inspects Ashok Kharat’s office in Nashik, collecting crucial evidence during the probe.Saam Tv
Published On

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिक: भोंदू अशोक खरातच्या नाशिकमधील कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयाची फॉरेन्सिक टीमने सोमवारी दुपारी चौथ्यादा तपासणी केली. या तपासणीत पथकाने फिर्यादी महिलेला सोबत आणून भोंदूबाबाच्या काळ्या कारवायांची माहिती जाणून घेतली. या तपासणीमध्ये कार्यालयात असलेले पेढे, अंगठीमधील खडे तसेच औषधाची एक बाटली जप्त करण्यात आली आहे. तब्बल 40 मिनिटे तपास सुरू होता.

याआधी केलेल्या फॉरेन्सिक तपासणीत प्रिंटर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले होते. भोंदूबाबाचे हायलेवल दर्जाच्या काळ्या काचाआड चालणारे काळे कृत्य पीडित महिलेकडून जाणून घेत पथकाने डिजिटल पुरावे गोळा केले. भोंदू खरातला कार्यालयात पोहोचली.

Forensic team inspects Ashok Kharat’s office in Nashik, collecting crucial evidence during the probe.
Maharashtra Weather: मुंबईसह राज्यात पाऊस कोसळणार, वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता; २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट

पथक आतमध्ये जाताच आतून दरवाजा लावण्यात आला. भोंदू खरातचा दरबार कसा चालत होता, तो बाहेर असलेल्या वेटिंगवर असलेल्या त्याच्या भक्तांना भेटण्यास आल्यावर काय करत होता याची माहिती पथकाने घेत ठसे गोळा केले. SIT पथकाने पंचनामा झाल्यावर पंच आणि साक्षीदारासोबत रेकॉर्ड जतन करण्याच्या अनुषंगाने किंवा तपासाचा एक भाग म्हणून फॉरेन्सिकच्या टीमने सेल्फी घेतला.

Forensic team inspects Ashok Kharat’s office in Nashik, collecting crucial evidence during the probe.
Sangli Crime: सांगली जिल्हा हादरला, एकाच दिवसात ३ जणांची निर्घृण हत्या

काय आढळले फॉरेन्सिक टीमला तपासात?

फॉरेन्सिक टीमने फिर्यादी महिलेसोबत जाऊन विविध प्रकारचे वैज्ञानिक पुरावे गोळा केले. यामध्ये घटनास्थळी आढळणारे केस, त्वचेचे कण, कपडे किंवा तुटलेली वस्तू भोंदूबाबा पीडितांना देत असलेले ओषध पेढा याचा समावेश होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com