सांगलीत एकाच दिवशी ३ हत्या
वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या घटना
एका आरोपीला पोलिसांनी अटक केली इतर फरार आरोपींचा शोध सुरू
या घटनेचा तपास पोलिस करत आहेत
सांगली जिल्ह्यात एकाच दिवसात ३ जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सांगलीमध्ये एक तर जतमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दोन हत्याच्या घटना घडल्या. एकाच दिवसात जिल्ह्यामध्ये ३ हत्येच्या घटना घडल्यामुळे सांगली जिल्हा हादरला आहे. या तिन्ही हत्या प्रकरणाचा तपास सांगली पोलिसांकडून सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यामध्ये एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या ठिकाणी हत्येच्या घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. सांगली शहरातील लक्ष्मी मंदिर येथे थरारक पाठलाग करून सौरभ पवार या गुन्हेगाराची निर्घृण हत्या करण्यात आली. तर जतमधील वळसंग येथे एका महिलेच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकून तसेच तिचे डोके दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. तर जतमधील बिळूर येथे सामायिक जमीन आणि विहिरीच्या वादातून श्रीधर येलगोंडा याची हत्या करण्यात आली. हत्येनंतर हल्लेखोर फरार झाले.
सांगली शहरातील मुख्य रस्त्यावर सोमवारी रात्री सौरभ पवार या गुन्हेगाराचा पाठलाग करून काही तरुणांनी त्याच्यावर धारदार हत्यारांनी हल्ला केला. शाहिद मुल्ला आणि आयान भिस्ती या दोघांनी त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. दरम्यान या प्रकरणी शाहीद मुल्लाला पोलिसांनी अटक केली. मुख्य रस्त्यावरून पाठलाग करून सौरभ पवारची हत्या करण्यात आल्याने सांगली शहरात खळबळ उडाली होती. या ३ हत्याकांडाच्या घटनांमुळे सांगलीत खळबळ उडाली असून पोलिस तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.