Kolhapur : कोल्हापूरात थरार! मुलाने कुऱ्हाडीने केली बापची हत्या, सख्ख्या भावाचाही जीव घेतला, कारण फक्त…?

Kolhapur Crime News : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात शेतीच्या वादातून वडील आणि मुलाचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Kolhapur : कोल्हापूरात थरार! मुलाने कुऱ्हाडीने केली बापची हत्या, सख्ख्या भावाचाही जीव घेतला, कारण फक्त…?
Kolhapur Crime NewsSaam tv
Published On
Summary
  • कोल्हापुरात शेतीच्या वादातून दुहेरी हत्या

  • वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू

  • आरोपी मोठा भाऊ पोलिसांच्या ताब्यात

  • पोलिस आणि फॉरेन्सिक तपास सुरू

रणजित माजगावकर, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हिंगणगावात शेतीच्या वादातून दुहेरी खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत वडील आणि मुलाचा निर्घृण खून करण्यात आला असून आरोपी मोठा भाऊ पोलिसांच्या ताब्यात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शितल मारुती कुंडले (४५) आणि त्यांचे वडील मारुती बंडू कुंडले (७२) यांच्यावर कुऱ्हाड आणि खोऱ्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. जमिनीच्या वाटपावरून कुटुंबात सतत वाद सुरू होते. काल सायंकाळी पुन्हा वाद झाल्यानंतर संतापाच्या भरात मोठा भाऊ संभाजी कुंडले याने हा हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.

Kolhapur : कोल्हापूरात थरार! मुलाने कुऱ्हाडीने केली बापची हत्या, सख्ख्या भावाचाही जीव घेतला, कारण फक्त…?
Gold Rate : चांदी तब्बल ₹३१००० नी स्वस्त, सोन्यातही मोठी घसरण, वाचा 24k आणि 22k चे दर

घटनेनंतर संशयित आरोपी संभाजी कुंडले स्वतःहून हातकणंगले पोलिसांत हजर झाला आहे. तर त्याचा मुलगा विवेक हा जखमी असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात चार दिवसांपूर्वीच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र वेळेत कारवाई झाली असती तर ही घटना टळली असती, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

Kolhapur : कोल्हापूरात थरार! मुलाने कुऱ्हाडीने केली बापची हत्या, सख्ख्या भावाचाही जीव घेतला, कारण फक्त…?
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचं इंटरनॅशनल कनेक्शन; परदेशात पैसा पाठवण्यासाठी हवाल्याचा वापर?

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून फॉरेन्सिक पथकही दाखल झाले आहे. दरम्यान, या दुहेरी खुनामुळे संपूर्ण हिंगणगाव परिसर हादरून गेला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com