Shocking : वर्षाला ४० लाखाची कमाई करणारा इंजिनियर बनला हैवान; वडिलांसह कुटुंबातील ८ जणांचा घेतला जीव,नेमकं कारण काय?

Bihar Crime News : लग्नाच्या वादातून संतप्त झालेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने स्वतःच्या कुटुंबातील ८ जणांवर चाकूने हल्ला केला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे.
Shocking : वर्षाला ४० लाखाची कमाई करणारा इंजिनियर बनला हैवान;  वडिलांसह कुटुंबातील ८  जणांचा घेतला जीव,नेमकं कारण काय?
Bihar Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • लग्नाच्या वादातून कुटुंबावर चाकू हल्ला

  • एका महिलेचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी

  • आरोपी सॉफ्टवेअर इंजिनिअर अटकेत

  • दागिन्यांच्या वादामुळे संताप वाढला

  • पोलिसांकडून पुढील तपास सुरू

माणूस प्रेमात आंधळा होतो असं म्हणतात. याचं आंधळेपणात आपलं आणि परकं याचं भान देखील अनेकदा प्रेमी युगुलांना राहत नाही. आपल्या मनासारखं लग्न ठरत नसल्याने आणि दागिन्यांवरून झालेल्या वादानंतर एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने स्वतःच्या कुटुंबातील ८ जणांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर ७ जण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव दिपक कुमार असे आहे. दिपक हा बंगळूरु येथील एका नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतो आणि त्याला वर्षाला ४० लाख रुपये इतका पगार आहे. त्याचे त्याच कंपनीतील एका सहकारीसोबत प्रेमसंबंध होते. त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या या इच्छेकडे दुर्लक्ष करून त्याचे लग्न दुसऱ्या मुलीशी ठरवले. दरम्यान दिपक १७ एप्रिल रोजी लग्नासाठी आपल्या गावी परतला, पण त्याच्या मनात द्वेषाची आग धगधगत होती.

Shocking : वर्षाला ४० लाखाची कमाई करणारा इंजिनियर बनला हैवान;  वडिलांसह कुटुंबातील ८  जणांचा घेतला जीव,नेमकं कारण काय?
Shocking : भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल, राजकारणात मोठी खळबळ

दिपक गावी येण्यापूर्वीच दागिन्यांवरून कुटुंबात वाद सुरु होता. दिपकची मागणी होती की, सासरच्या मंडळींकडून त्याला १० लाख ते १२ लाख रुपये किमतीचे ब्रँडेड दागिने मिळावेत. हे प्रकरण इतके वाढले की यावरून पुन्हा वाद उफाळला. संतापलेल्या दिपकचा संयम सुटला. त्याने घरात ठेवलेला चाकू उचलून आपल्याच कुटुंबातील सदस्यांवर हल्ला केला.

Shocking : वर्षाला ४० लाखाची कमाई करणारा इंजिनियर बनला हैवान;  वडिलांसह कुटुंबातील ८  जणांचा घेतला जीव,नेमकं कारण काय?
Crime News : तरुणाने लैंगिक अत्याचार केले, धर्मांतरासाठी दबाव टाकला; बीडमधील महिलेसोबत भयंकर घडलं

दिपकने रागाच्या भरात वडील, काकासह घरातील ८ कुटुंबियांवर हल्ला केला. या हल्ल्यात दिपकच्या आत्येचा दुर्दैवी मृत्यू झाला तर, इतर ७ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. धक्कादायक म्हणजे कुटुंबावर हल्ला केल्यानंतर दिपकने स्वतःवर देखील हल्ला करून घेतला. याप्रकरणी आजूबाजूच्या नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत दिपकला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com