
सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. बीपीसीएल म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्यासाठी. भारत पेट्रोलियममध्ये ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह, असोसिएट एक्झिक्युटिव्ह आणि सेक्रेटरी अशा अनेक पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला भरघोस पगारदेखील मिळणार आहे. (BPCL Recruitment)
भारत पेट्रोलियममध्ये ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (इंजिनियरिंग), ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (अकाउंट्स), असोसिएट एक्झिक्युटिव्ह (इंजिनिरिंग), असोसिएट एक्झिक्युटिव्ह (क्वालिटी एश्योरन्स), सेक्रेटरी पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
पात्रता
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (इंजिनियर) पदासाठी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, सिविल, केमिकल इंजिनियरिंगमध्ये ३ वर्षांचा डिप्लोमा केलेला असावा. असोसिएट एक्झिक्युटिव्ह पदासाठी B.Tech/BE किंवा B.Sc (इंजीनियरिंग) केलेले असावे. असोसिएट एक्झिक्युटिव्ह (क्वालिटी एश्योरन्स) पदासाठी M.Sc (केमिस्ट्री)-ऑर्गेनिक, फिजिकल, इनऑर्गेनिक किंवा एनालिटिकलमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. सेक्रेटरी पदासाठी १०वी, १२वी किंवा ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करु शकतात.
पगार
बीपीसीएलमधील या नोकरीसाठी ३० ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदासाठी ३०,००० ते १,२०,००० रुपये पगार मिळणार आहे. असोसिएट एक्झिक्युटिव्ह पदासाठी ४०,००० रुपये ते १,४०,००० रुपये पगार मिळणार आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाणार आहे. त्यानंतर ऑनलाइन टेस्ट घेतली जाणार आहे. यानंतर तुमच्या केस-बेस्ड डिस्कशन केले जाणार आहे. पर्सनल इंटरव्ह्यू घेतले जाणार आहे.
या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहे. अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १,१८० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. राखीव प्रवर्गासीठा कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.