
भारतीय हवाई दलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एअर फोर्समध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. एअर फोर्समध्ये ग्रुप सी सिविलियन पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. लोअर डिवीजन क्लर्क, हिंदी टाइपिस्ट, कुक, स्टोअर कीपर, कारपेंटर, मस्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. (Air Force Recruitment)
इंडियन एअरफोर्समधील नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२५ आहे. मुदतीनंतर तुमचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत. भारतीय हवाई दलात १४८ रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
एअर ऑफिसर कमांडिंग, एअर फोर्स स्टेशन अर्जन सिंह, पनगढ, वेस्ट बंगाल ७१३१४८ साठी आहे. यासोबतच एअर ऑफिसर कमांडिंग एअर फोर्स स्टेशन, तेजपुर, आसाम येथील लोवर डिवीजन क्लार्कसाठी १, वेस्टर एअर कमांडसाठी हिंदी टायपिस्ट, एअरफोर्स सेंट्रल अकाउंट्स ऑफिसमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. स्टोअर कीपर पदासाठी १२वी पास असणे गरजेचे आहे. सिविलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, कुक पेंटर, कारपेंटर, हाउसकिपिंग, एमटीएस पदांसाठी १०वी पास करणे गरजेचे आहे. (Air Force Recruitment 2025)
या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. एलडीसी क्लर्क पदासाठी १२वी पास असणे गरजेचे आहे. हिंदी टायपिस्ट पदासाठी तुम्हाला टायपिंगची परीक्षा द्यावी लागणार आहे. वेगवेगळ्या पदांसाठी पात्रता वेगवेगळी असणार आहे. या नोकरीसाठी १८ ते २५ वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करावेत. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.