Anganwadi Recruitment Scam : अंगणवाडी भरतीत गैरव्यवहार; सीलबंद अर्ज फोडून गैरव्यवहार केल्याचा आरोप, चौकशीचे आदेश

Thane News : मुरबाड एकात्मिक बाल विकास प्रकल्प एक मार्फत अंगणवाडी भरतीची जाहिरात काढण्यात आली. त्यात अंगणवाडी सेविका १४ पदे आणि मदतनीस ३८ पदे अशी ५२ पद भरतीसाठी २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागवण्यात आले
Anganwadi Recruitment Scam
Anganwadi Recruitment ScamSaam tv
Published On

मयुरेश कडव 
मुरबाड (ठाणे)
: शून्य ते पाच वर्ष वयोगातील लहान बालकांना पोषक आहार व शिक्षणाचे प्राथमिक धडे मिळावेत यासाठी अंगणवाडी आहेत. या अंगणवाडीतील अनेक पदे रिक्त असून या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. मात्र मुरबाड तालुक्यातील अंगणवाडी भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी; अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता योगिता शिर्के यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडे केली. 

मुरबाड मधील एकात्मिक बाल विकास प्रकल्प एक मार्फत अंगणवाडी भरतीची जाहिरात काढण्यात आली होती. त्यात अंगणवाडी सेविका १४ पदे आणि मदतनीस ३८ पदे अशी ५२ पद भरतीसाठी २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते. यासाठी अनेकांनी अर्ज देखील केले आहेत. परंतु महिला बालविकास प्रकल्प अधिकारी योगेश यंदे, त्यांची पत्नी आणि शिपाई यांनी यात गैव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Anganwadi Recruitment Scam
Accident News : लग्नात भाचीला आशीर्वाद देऊन परतलेल्या मामावर काळाचा घाला; घरी परतताना दुचाकीला अपघात, मामी जखमी

पाकिटांचे सील फोडून अफरातफर 

रविवारी सुट्टीच्या दिवशी भरती अर्जाचे सिल फोडून कागदपत्रांची अफरातफर करत यंदे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला असा शिर्के यांचा आरोप आहे. भरती प्रक्रियेत पाकीट फोडल्याचे पुरावेही त्यांनी सादर केले आहेत. भरती अर्जाचे सिल फोडताना कोणतीही टिप्पणी टाकण्यात आलेली नव्हती. तसेच आदेशही काढण्यात आले नव्हते. इतकच नाही तर समितीवरील सदस्यांच्या समक्ष सह्या न घेता यंदे यांची पत्नी कुठल्या अधिकारात कार्यालयात आली आणि कार्यालयातील कागदपत्रे कशी काय हाताळली? असा सवालही शिर्के यांनी उपस्थित केला.  

Anganwadi Recruitment Scam
Sangli : घराच्या मोकळ्या जागेवर गांजा लागवड; १० किलो गांजाची २३ झाडे जप्त

सीईओनी दिले चौकशीचे आदेश 

दरम्यान या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच चौकशी सुरू असताना पर्यावेक्षिका प्रभारी कार्यभार स्वीकारलेल्या निशा तारमळे यांना कोणत्याही प्रकारचा नियुक्तीचा‌ अधिकार नसताना त्यांनी नियुक्त्या कुठल्या अधिकाराने‌ केल्या? असा सवालही शिर्के यांनी केला. याबाबत त्यांनी गटविकास अधिकारी गायकवाड यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी मौन धारण केले. सदर‌ प्रकरणी दोषींवर कारवाईस टाळाटाळ केल्यास उपोषणाचा मार्ग स्वीकारणार असल्याचा इशारा शिर्के यांनी दिलाय. दरम्यान शिर्के यांच्या तक्रारीवरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com