NABARD Recruitment
NABARD RecruitmentSaam tv

NABARD Recruitment: नाबार्डमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पगार ३ लाख रुपये महिना; पात्रता अन् अर्जप्रक्रिया काय?

NABARD Recruitment 2025: नाबार्डमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. नाबार्डमध्ये सध्या स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
Published on

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. नाबार्ड म्हणजे नॅशनल बँक फॉर्म अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. नाबार्डमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Nabard Recruitment)

NABARD Recruitment
IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये नोकरीची संधी; १७७० पदांसाठी निघाली भरती; अर्ज कसा अन् कुठे करायचा?

नाबार्डमधील ही भरती ६ रिक्त पदांवर होणार आहे. वेगवेगळ्या विभागात ही भरती होणार आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. या नोकरीसाठीचे ठिकाण नाबार्डचे हेड ऑफिस मुंबई आहे. त्यामुळे तुम्ही मुंबईत राहत असाल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे.

नाबार्डमधील स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी अर्जप्रक्रिया १६ मे २०२५ पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जून २०२५ आहे.इच्छुकांनी नाबार्डच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. (Nabard Recruitment 2025)

In Charge–Survey Cell पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३८ ते ५५ वयोगटातील असावे. सिनियर स्टॅटिस्टिकल अॅनालिस्ट पदासाठी ३० ते ४५ वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करावेत. Statistical Analyst पदासाठी २४ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित क्षेत्रात मास्टर्स डिग्री प्राप्त केलेली असावी.

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १५० ते ८५० रुपये फी भरावी लागणार आहे.राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १५० रुपये फी भरावी लागणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. या नोकरीबाबत अधिक माहिती तुम्हाला वेबसाइटवर मिळेल. अर्ज करण्यापूर्वी ही माहिती नक्की वाचा.

NABARD Recruitment
Government Job: १०वी पास तरुणांना सरकारी विभागात नोकरीची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती सुरु, पगार ५६००० रुपये; अर्ज कसा करावा?

पगार (Nabard Recruitment 2025)

या नोकरीसाठी निवड झाल्यावर In Charge–Survey Cell पदासाठी ३ लाख रुपये महिना पगार मिळणार आहे. Senior Statistical Analyst पदासाठी २ लाख रुपये पगार मिळणार आहे. Statistical Analyst पदासाठी १.२५ लाख रुपये पगार मिळणार आहे.

NABARD Recruitment
Bank Of Baroda Job: १०वी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी; बँक ऑफ बडोदात भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com