

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट
३० एप्रिलपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना द्यायच्या आहेत सूचना
या सूचनांवर तयार केल्या जातात शिफारसी
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी १ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू होणार आहे. आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा पगार भरघोस वाढणार आहे. कर्मचाऱ्यांचा पगार, पेन्शन, भत्ता सुधारण्याबाबत चर्चा सुरु आहे. याबाबत काम सुरु आहे. अर्थ मंत्रालयाने कर्मचारी, पेन्शनधारक, कर्मचारी संघटनांकडून सूचना मागितल्या होत्या. यासाठी पोर्टल सुरु केले आहे. आता यावर तुम्हाला सूचना द्यायच्या आहेत. यासाठीची डेडलाइन ३० एप्रिल २०२६ पर्यंत आहे.
आठव्या वेतन आयोगात्या शिफारसी लागू झाल्यानंतर ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६९ लाख पेन्शनधारकांवर परिणाम होणार आहे. आयोगाने यासाठी १८ महिन्यांचा वेळ दिला आहे.सरकारने मंजुरी दिल्यानंतर वेतन आणि पेन्शनमध्ये बदल केले जातील.
वेतन आयोग आहे तरी काय?
केंद्र सरकार वेळोवेळी वेतन आयोग तयार करतात. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये बदल केले जातात. आयोगात महागाई, आर्थिक स्थिती आणि सरकारची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सॅलरी आणि भत्त्यांमध्ये बदल केले जातात. भारतात सर्वात आधी १९४६ मध्ये वेतन आयोग तयार केला होता. आतापर्यंत एकूण ७ वेतन आयोग लागू करण्यात आले आहेत. त्यानंतर आठवा वेतन आयोग लागू करणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.