

आठव्या वेतन आयोगाचे काम सुरु
सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार?
कधी होणार आठवा वेतन आयोग लागू?
सरकार कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आठव्या वेतन आयोगाचे काम सुरु झाले आहे. आठवा वेतन आयोग प्रत्यक्षात लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शनमध्ये भरघोस वाढ होणार आहेत. दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो. त्यानंतर कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ मिळते. दरम्यान, आठव्या वेतन आयोगाचा फायदा ५० लाख कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना होणार आहे. जवळपास १ कोटींपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
आठव्या वेतन आयोगाचे काम
आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या पगारात, भत्त्यांमध्ये, पेन्शनमध्ये, निवृत्तीवेतनात सुधारणा केली जाणार आहे. यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.या समितीच्या अध्यक्षपदी माजी न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई यांची निवड करण्यात आली आहे.प्राध्यापक पुलक घोष आणि पंकज जैन यांची सदस्य सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे.
आठव्या वेतन आयोगासाठी २४ एप्रिल २०२६ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. यानंतर आता आठव्या वेतन आयोगाच्या कामाला वेग आला आहे. ७वा वेतन आयोग लागू होण्यास अडीच वर्ष, सहाव्या वेतन आयोगासाठी २ वर्षे आणि ५ व्या वेतन आयोगासाठी साडेतीन वर्षे वाट पाहावी लागली होती. त्यानंतर आता आठव्या वेतन आयोगासाठी किती वाट पाहावी लागणार याबाबत माहिती समोर आलेली नाही.
पगार किती वाढणार? (8th Pay Commission Salary Hike)
आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. लेव्हल १ कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी १८,००० रुपयांवरुन ५१,४८० रुपये होऊ शकते. त्यामुळे प्रत्यक्ष वाढ ३८,५०० ते २ लाखांपर्यंत होऊ शकते.या आयोगामध्ये पेन्शनधारकांनाही दिलासा मिळणार आहे. त्यांच्याही पेन्शनमध्ये वाढ होणार आहे. दरम्यान, अंतिम शिफारसी आल्यानंतरच आकडेवारी समजेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.