

नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय
नीट पेपरफुटी प्रकरणात 14 आरोपींविरुद्ध आरोप निश्चित
एनटीएच्या तीन विषय तज्ज्ञांचाही आरोपींमध्ये समावेश
NEET UG 2026 पेपरफुटी प्रकरणात दिल्लीतील राऊस एव्हेन्यू संकुलातील एका विशेष जलदगती न्यायालयाने शनिवारी महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. न्यायालयाने या प्रकरणातील १४ आरोपींविरुद्ध औपचारिकपणे आरोप निश्चित केलेत. आरोपींमध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) शी संबंधित तीन विषय तज्ज्ञांचाही समावेश आहे. त्यांच्याविरुद्धचा खटला 25 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
न्यायालयाने आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले असून त्यात यश यादव, मांगीलाल बिवाल, दिनेश बिवाल, विकास बिवाल, शुभम खैरनार, धनंजय लोखंडे, प्रल्हाद कुलकर्णी, तेजस हर्षद कुमार, डॉ. मनोज शिरूरे, शिवराज वाघमारे, मनीष वाघमारे, मो. मांडरे, आणि मनीषा संजय हवालदार अशी आरोपींची नावे आहेत.मात्र या सर्व आरोपींनी त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप मान्य करण्यास नकार दिला आहे.
NEET-UG पेपरफुटी प्रकरणाच्या संदर्भात, CBI ने २०,००० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणातील पहिले आरोपपत्र तपास संस्थेने जुलै महिन्यातच सादर केले होते. १२ ऑगस्ट रोजी, राऊस अव्हेन्यू येथील विशेष जलदगती न्यायालयाने CBI च्या या आरोपपत्राची दखल घेतली. याआधी न्यायालयाने सर्व आरोपींना २१ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले होते. २१ नोव्हेंबर रोजी या प्रकरणातील आरोपींविरुद्ध औपचारिक आरोप निश्चित केले जातील, असे सांगण्यात आले होते. या प्रकरणाची दररोज सुनावणी २५ नोव्हेंबरपासून सुरू होईल, असं न्यायालयानं सांगितलंय.
सीबीआयने नीट-यूजी (NEET-UG) पेपरफुटी प्रकरणात २०,००० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणातील पहिले आरोपपत्र सीबीआयने जुलै महिन्यात दाखल केले होते. १२ ऑगस्ट रोजी, राऊस ॲव्हेन्यू कोर्ट संकुलातील एका विशेष जलदगती न्यायालयाने सीबीआयच्या या आरोपपत्राची दखल घेतली.
सीबीआयने आपल्या आरोपपत्रात म्हटलं की, तीन विषय तज्ज्ञांनी दिल्लीतील एनटीए कार्यालयातून विविध मार्गांनी नीट परीक्षेचे प्रश्न मिळवले. गोपनीय विभागातून बाहेर पडताना त्यांची आरोपींची कसून तपासणी केली जात नव्हती. एनटीएच्या गोपनीय विभागात प्रवेश करताना किंवा तिथून बाहेर पडताना तज्ज्ञांची तपासणी करण्याची कोणतीही पद्धत अस्तित्वात नव्हती, असं सीबीआयने आरोपपत्रात नमूद केलंय. NTA कडे थेट CCTV फीडवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) नव्हता, ज्याचा अर्थ असा की गोपनीय कक्षातील तज्ज्ञांच्या हालचालींवर कोणाचेही लक्ष नव्हते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.