Sakshi Sunil Jadhav
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेला रायगड किल्ला हा इतिहास आणि निसर्ग यांचा अप्रतिम संगम आहे. या किल्ल्यावरून दिसणारे दऱ्या-खोऱ्यांचे दृश्य तुमचं मन मोहून टाकतं.
पांढरी शुभ्र वाळू आणि स्वच्छ निळसर पाणी यामुळे हा बीच खूपच आकर्षक वाटतो. शांत वातावरणात सूर्यास्त पाहण्याचा अनुभव खास असतो.
समुद्रकिनारी वसलेलं हे मंदिर धार्मिक आणि निसर्गरम्य वातावरण देतं. भोवतीचा समुद्र आणि टेकड्या दृश्य अधिक सुंदर बनवतात.
निळसर पाणी आणि पांढरी वाळू यामुळे हा बीच प्रसिद्ध आहे. तुम्हाला इथे वॉटर स्पोर्ट्सचा फॅमिली किंवा फ्रेंड्ससोबत फिरता येईल.
समुद्राच्या मध्यभागी उभा असलेला मुरुड-जंजिरा किल्ला हा सगळ्यात भव्य आणि अनोखा आहे. तुम्ही इथे गेल्यावर बोटीने किल्ल्यापर्यंत जाण्याचा जबरदस्त मजेशीर अनुभव घेऊ शकता.
पावसाळ्यात धबधबे आणि हिरवाईने नटलेला हा घाट खूपच सुंदर दिसतो. धुक्याच्या सान्निध्यातील प्रवास मनाला शांतता देतो.
रिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध असलेले कोलाड अॅडव्हेंचर प्रेमींसाठी उत्तम ठिकाण आहे. निसर्गाच्या कुशीत थरार अनुभवता येतात.
मुंबईजवळ असल्यामुळे हा बीच खूप लोकप्रिय आहे. समुद्रात चालत जाऊन किल्ल्यापर्यंत पोहोचण्याचा अनुभव वेगळाच असतो.
घनदाट जंगल आणि विविध पक्षी-प्राण्यांमुळे हे ठिकाण खास आहे. शांत वातावरणात ट्रेकिंगचा आनंद घेता येतो.
शांत वाहणारी नदी आणि हिरवागार परिसर मन प्रसन्न करतो. कॅम्पिंग आणि वॉटर अॅक्टिव्हिटीजसाठी हे बेस्ट ठिकाण आहे.