Property Rental Tips : भाड्याने घर घेताय? या गोष्टी लक्षात घ्या, अन्यथा कायद्याच्या कचाट्यात सापडाल

Property News : तुम्हाला डील्स करण्याचा मोह होत असला तरी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
Property Rental Tips
Property Rental TipsSaam Tv
Published On

Want To Rent A House :

तुम्हीही घर भाज्याने घ्यायचा विचार करताय? तुम्ही ऑनलाईन अप्सचा वापर करता तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अशा अॅप्सच्या सहाय्याने घर भाड्याने पाहणाऱ्या लोकांना फसव्या लोकांच्या आहारी जावे लागते. तसेच ऑनलाईन पाहणाऱ्या भाड्याच्या घराचे व्यवहार हे रिअल इस्टेट क्षेत्रातील लोकांना सतत धोका मिळण्याची प्रकरण सध्या वाढली आहेत. बरेच मालक हे भाडेकरूंच्या असुरक्षिततेचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक करतात. भाडेकरू म्हणून तुमच्या हिताचे रक्षण करण्यासाठी हे लक्षात घेणे गरजेचे आहे. तुम्हीही ऑनलाइन, ऑफलाइन किंवा ब्रोकरसोबत प्रॉपर्टी पाहात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा.

अव्‍यावहारिक डील्सपासून सावध राहा

रिअल इस्टेट (Real Estate) मार्केटमध्ये आपल्याला आवडणाऱ्या डील्सची कमतरता नसते. तुम्हाला डील्स करण्याचा मोह होत असला तरी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. निरीक्षण आणि किंमतींची तुलना करण्यासाठी वेळ काढा.

समजूतदार आणि माहितीपूर्ण दृष्टीकोनाने, तुम्ही रिअल इस्टेटच्या लँडस्केपमध्ये नेव्हिगेट करू शकता. यामुळे तुम्ही फसवणुक करणाऱ्या लोकांपासून रचलेल्या सापळ्यात अडकणार नाहीत. प्रथम तुम्ही घर शोधत असलेल्या परिसरात सरासरी भाडे किती आहे हे तपासा आणि तुम्हाला काय ऑफर दिली जात आहे ते समजून घ्या.

Property Rental Tips
Real Estate : घर घेताय? कारपेट आणि बिल्ट-अप एरियामध्ये काय आहे फरक? माहित करुन घ्या, अन्यथा होईल फसवणूक

स्वतः जाऊन प्रॉपर्टी पाहा

व्हर्च्युअल प्रॉपर्टी टूर आणि इमर्सिव्ह ऑनलाइन (Online) लिस्टिंग प्रॉपर्टी शॉर्टलिस्ट करण्याचा उत्तम मार्ग आहे. परंतू टोकन मनी फायनल करण्याआधी किंवा जमा करण्यापूर्वी तुम्ही प्रॉपर्टीची स्वत: जावून तपासा. खरेदीदारांनी प्रॉपर्टीची स्थिती पाहणे गरजेचे आहे.

तुम्हाला मिळालेल्या माहितीची सत्य स्थिती पडताळून पाहण्यासाठी तुम्ही शेजारी किंवा वॉचमन/सोसायटी मॅनेजरशी बोलून प्रॉपर्टी आणि मालक दोघेही खरे असल्याची खात्री करू शकता. तुम्ही कदाचित तुमचे शहर सोडून दुसर्‍या शहरांमध्ये भेट देत असाल तर प्रॉपर्टी तपासू शकत नाही किंवा मालकाला समोरा समोर भेटू शकत नाही हे कधीही लक्षात घ्या.

रेड फ्लॅग

जर एखाद्या प्रॉपर्टीच्या (Property) मालकाने असे म्हटले की बरेच लोक त्याची प्रॉपर्टी खरेदी करू इच्छित आहेत आणि तुम्ही प्रॉपर्टीला प्रत्यक्ष भेट न देता तुम्हाला टोकन मनी देण्यासाठी तुमच्यावर खूप दबाव आणत असेल, तर या ठिकाणी दुप्पट सावध रहा. आणि सर्वकाही दोनदा चेक करा. तुमच्या पैशांचा फायदा कोणालाही घेऊ देऊ नका.

पेैसे देण्यापूर्वी त्या प्रॉपर्टी (भाडेपट्टी) लीज करार ठोस तयार करा. नेहमी लक्षात ठेवा की पैसे देण्यापूर्वी तुमच्याकडे (भाडेपट्टी) लीज करार असणे आवश्यक आहे. योग्य कायदेशीर कागदपत्रांशिवाय आगाऊ पैसे मागणाऱ्यांपासून सावध रहा. व्यवहाराच्या अटी स्पष्टपणे दिलेल्या लीज कराराचा आग्रह मालकाकडे करा. भाड्याबाबत कोणतीही आर्थिक देणे करण्यापूर्वी हा करार केला जातो.

ओळखीची खात्री बाळगा

बर्‍याच वेळा फसवणूक करणारे लोक लष्कराचे जवान असल्याचे सांगतात. त्यांची अट अशी असते की त्यांची प्रॉपर्टी पाहता येणार नाही आणि तुम्हालाही भेटता येणार नाही. असे फसवे लोक पॅनकार्डसारख्या बनावट ओळखीचा पुरावाही दाखवू शकतात. अशा प्रकरणांमध्ये, जोपर्यंत तुम्हाला त्यांच्या ओळखीबद्दल पूर्ण खात्री होत नाही तोपर्यंत लीज करार करू नका.

Property Rental Tips
'द केरला स्टोरी'मधली खलनायिका 'असिफा'ची ही आहे Real स्टोरी | Sonia Balani

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com