Real Estate : घर घेताय? कारपेट आणि बिल्ट-अप एरियामध्ये काय आहे फरक? माहित करुन घ्या, अन्यथा होईल फसवणूक

Before Buying Peoperty : तुम्हाला फक्त घराचा आकार आणि किमतीकडे लक्ष द्यावे लागणार नाही तर काही छोट्या गोष्टींकडेही लक्ष द्यावे लागेल.
Real Estate
Real EstateSaamTv

What Is Carpet And Built-Up Area Difference :

जर तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला फक्त घराचा आकार आणि किमतीकडे लक्ष द्यावे लागणार नाही तर काही छोट्या गोष्टींकडेही लक्ष द्यावे लागेल. घर ही एक मोठी गोष्ट आहे, तुमचे हे स्वप्न साकार करताना तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे. म्हणून प्रत्येक लहान गोष्टी जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

सामान्यतः जेव्हा आपण घर खरेदी करतो तेव्हा आपण घर (Home) किती मोठे आहे याचा विचार करतो. घराच्या आकारासाठी, तुम्हाला कार्पेट एरिया, बिल्ट-अप एरिया आणि सुपर बिल्ट-अप एरिया यांसारख्या शब्दांना सामोरे जावे लागते. या शब्दांप्रमाणे ते कसे मोजले जाते ते पाहा.

Real Estate
House Price Hike : मुंबईतील 'ड्रीम होम' महागलं; वर्षभरात घरांच्या किमती किती वाढल्या? पाहा लिस्ट

याबाबतीत बहुतांश लोकांची समज फारच कमी असते. त्यामुळे अनेकदा बांधकाम व्यावसायिक आणि प्रॉपर्टी डीलर्स लोकांच्या अज्ञानाचा फायदा (Benefits) घेतात. घराची किंमत प्रति चौरस फूट ठरलेली असते. जर घराचा आकार कमी असेल आणि त्याची किंमत तुम्हाला जास्त सांगितले तर तुमची फसवणूक होईल.

त्यामुळे प्रॉपर्टीशी संबंधित हे तीन शब्द तुम्हाला माहिती असणे महत्त्वाचे आहे. आता सुपर बिल्ट-अप क्षेत्राच्या आधारावर मालमत्ता विकणे बेकायदेशीर झाले आहे. आता केवळ कारपेट एरिया निश्चित करण्यासाठी योग्य मानले जाते.

कार्पेट एरिया

कार्पेट एरिया म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात वापरत असलेले क्षेत्र. सोप्या शब्दात सांगायचे तर, ज्या खोलीत तुम्ही कार्पेट घालू शकता त्या खोलीला कार्पेट एरिया म्हणतात. त्याला नेट युजेबल एरिया (NUA) असेही म्हणतात. यामध्ये तुमचा लिव्हिंग रूम, बेडरूम, बाथरूम आणि किचन (Kitchen) यांचा समावेश आहे. यामध्ये भिंतींच्या जाडीचा समावेश नाही. याशिवाय, तुमची बाल्कनी आणि टेरेस देखील समाविष्ट नाही.

बिल्ट-अप एरिया

तुम्हाला बिल्ट-अप एरिया सहज समजून घ्यायचा असेल, तर हे जाणून घ्या की साधारणपणे कार्पेट एरिया हा बिल्ट-अप एरियाच्या 60-70 टक्के आहे. यामध्ये कार्पेट एरियातून काढलेल्या वस्तूंचा समावेश होतो. म्हणजे त्यात भिंतींची जाडी, बाल्कनी, छत आणि कॉरिडॉर यांचा समावेश होतो.

सुपर बिल्ट-अप एरिया

तुम्ही हाऊसिंग सोसायटीमध्ये राहत असल्याने, तुम्ही बर्‍याच सामान्य क्षेत्रांचा वापर करता. याला सुपर बिल्ट अप एरिया म्हणतात. त्याला विक्रीयोग्य एरिया असेही म्हणतात. यामध्ये तुमच्या बिल्ट-अप एरियाचा ठराविक प्रमाणात तसेच लिफ्ट, कॉरिडॉर, क्लब हाऊस इत्यादींसह सर्व सामान्य एरियांचा समावेश होतो.

Real Estate
Chanakya Niti For Home : चाणक्य नीतीनुसार अशा घरांना अनेकदा संकटे येतात, जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com