House Price Hike : मुंबईतील 'ड्रीम होम' महागलं; वर्षभरात घरांच्या किमती किती वाढल्या? पाहा लिस्ट

Real Estate Price Hike : ऑगस्ट महिन्यात मुंबईत घरांसाठी लोकांनी मोठी गुंतवणूक केली आहे.
House Price Hike
House Price HikeSaam Tv

Housing Prices :

कोविड नंतर देशात अनेकल गोष्टी महागल्या आहेत. रोजच्या दैनंदिन वस्तुसोबत आता घर आणि मालमत्तेपर्यंत सर्वच गोष्टी महागड्या झाल्या आहेत. इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये घर खरेदी करणे महाग झाले आहे तसेच देशाची आर्थिक राजधानी मुंबईत घरांच्या विक्रीत खरेदीदारांनी मोठी उडी घेतली आहे. ऑगस्ट महिन्यात मुंबईत घरांसाठी लोकांनी मोठी गुंतवणूक केली आहे. जर गेल्या 10 वर्षांचा विचार केला तर या वर्षीचा ऑगस्ट महिना मुंबईसाठी खूपच जबरदस्त राहिला आहे.

रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या जून तिमाहीच्या आकडेवारीनुसार, भारतात (India) घरांच्या किमती वाढण्याचा ट्रेंड कायम आहे. या तिमाहीत ऑल इंडिया होम प्राइस इंडेक्स (HPI) मध्ये 5.1 टक्के वाढ नोंदवली गेली आहे, जी वाढून 311.9 झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत तो 296.6 वर होता. ऑगस्टपासून महिन्यात घरांच्या विक्रीत अजूनही जोरदार गती आहे. या वर्षीचा ऑगस्ट हा गेल्या 10 वर्षांतील सर्वोत्तम ठरला. ऑगस्ट महिन्यात 10550 घरांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.

House Price Hike
Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? LPG दरकपातीनंतर आणखी एक खूशखबर मिळण्याची शक्यता

त्यामुळे राज्य सरकारला अनेक कोटींचे उत्पन्न मिळाले

ऑगस्ट महिन्यात मुंबईत 10 हजारांहून अधिक घरांची नोंदणी झाली असून, त्यात चांगली वाढ दिसून येते. या घरांच्या नोंदणीचा ​​फायदा (Benefits) राज्य सरकारलाही झाला आहे. 10550 घरांच्या नोंदणीतून राज्य सरकारला 790 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. याशिवाय मुद्रांक शुल्कातही वर्षानुवर्षे 23 टक्के वाढ झाली आहे.

House Price Hike
House Price HikeSaam Tv

कोणत्या श्रेणीतील घरे सर्वाधिक विकली गेली?

नाइटफ्रँकने सादर केलेल्या अहवालात मुंबईतील घरांच्या विक्री प्रसिद्ध केल्या आहेत. या अहवालात असे सांगण्यात आले आहे की, मुंबईत 1 कोटी रुपयांच्या वरच्या घरांची विक्री सर्वाधिक झाली आहे, म्हणजेच लोकांनी महागडी घरे घेण्यास प्राधान्य दिले आहे. याशिवाय जानेवारी-ऑगस्ट 23 या कालावधीत 1 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या 57 टक्के घरांची (Home) विक्री झाली आहे.

House Price Hike
Home Loan EMI : गृहकर्ज घेताय ? वाढत्या व्याजदरात पैसे कसे वाचवाल ? असा वाचवा EMI चा दर

तर जानेवारी-ऑगस्ट 23' मध्ये 1 कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीच्या 48 टक्के घरांची विक्री झाली. याशिवाय, जानेवारी-ऑगस्ट 23' मध्ये 1 कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीची 35803 घरे विकली गेली' आणि जानेवारी-ऑगस्ट 23' मध्ये 1 कोटी रुपयांहून अधिक किमतीची 47460 घरे विकली गेली. नाईट फ्रँकच्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com