RBI Rule: RBI चा मोठा निर्णय! बँकांना यापुढे प्रत्येक व्यवहारांचे ठेवावे लागणार रेकॉर्ड; १ नोव्हेंबरपासून लागू होणार नियम

RBI New Rule For Records Of Cash Transactions: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकासाठी नवीन नियम जारी केले आहेत. आता प्रत्येक व्यव्हारांचे बँकाना रेकॉर्ड ठेवावे लागणार आहे. बँक व्यव्हारांमधील पारदर्शकता वाढवण्यासाठी हा नवीन नियम लागू करण्यात येणार आहे.
RBI Rule
RBI RuleSaam Tv
Published On

RBI New Rule For Records Of Cash Transactions: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकासाठी नवीन सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी काही नियम लावण्यात आले आहे. या नवीन नियमांनुसार, आता युजर्संना कोणत्याही बाह्य खात्यांमध्ये पैसे ट्रान्सरफर केल्यावर त्याची नोंद ठेवावी लागणार आहे. म्हणजेच, तुम्ही कोणत्याही व्यक्तीला पैसे पाठवले तर त्याची नोंद तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. हा नवीन नियम १ नोव्हेंबर पासून लागू होणार आहे. आर्थिक व्यव्हारांमध्ये पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.

RBI Rule
Petrol Diesel Rate: देशात पेट्रोल डिझेलचे आजचे दर काय? एका क्लिकवर वाचा तुमच्या शहरातील भाव

RBI ने ऑक्टोबर २०११ मध्ये केलेल्या डॉमेस्टिक कॅश ट्रान्सफर फ्रेमवर्कमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, बँकाना आता रोख पेमेंटच्या करणाऱ्या ग्राहकांची आणि ज्या व्यक्तींच्या अकाउंटमध्ये पेमेंट केले आहे त्यांचे रेकॉर्ड ठेवावे लागमार आहे. याशिवाय बँकेला पैसे पाठवणाऱ्या प्रत्येक व्यव्हाराचे प्रमाणीकरण करण्यासाठी ऑथेंटिकेशन करावे लागणार आहे. यामध्ये कार्ड टू कार्ड व्यव्हारांचा समावेश होत नाही.

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (SEBI)अभ्यासातून समोर आले आहे की, २०२२-२३ मध्ये इक्विटी कॅश श्रेणीतील ७१ टक्के गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. या काळात व्यवसाय करणाऱ्यांची संख्या ३०० टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहे.

RBI Rule
Share Market Prediction: शेअर बाजारात आज कोणते शेअर्स फायदेशीर ठरतील? कोणत्या स्टॉकने चांगली कमाई होईल? जाणून घ्या

३० वर्षांखालील गुंतवणूकदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे कॅश ट्रान्झॅक्शन करणाऱ्या ग्राहकांमध्ये पारदर्शकता नसल्याचे दिसून आले आहे. २०२२-२३ मध्ये, या गुंतवणूकदारांचा हिस्सा ४८ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. यामध्ये मोठे व्यव्हार करणाऱ्या गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळेच व्यव्हारांमध्ये पारदर्शकता निर्माण व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

RBI Rule
ITR : आयटीआर दाखल केल्यानंतर किती दिवसांनी परतावा मिळतो? पैसे न आल्यास काय करावं?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com