शनिवारी लोकसभेच्या सातव्या टप्प्यातील मतदान पूर्ण झालं आहे. त्यानंतर लगेचच 4 जून रोजी म्हणजेच उद्या निकाल लागणार आहेत. निकालाच्या आधी एक्सिटपोल समोर आलेत. यामध्ये भाजपच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीने जबरदस्त उच्चांक उसळी घेतली आहे. यामुळे गुंतवणूकदार चांगलेच सुखावले आहेत.
सोमवारी सकाळी शेअर मार्केट उघडल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये पावणेचार टक्क्यांपर्यंत वाढ पहायला मिळाली. सेन्सेक्सने जुना रेकॉर्ड मोडला असून सुसाट उच्चांक गाठलाय. तसेच निफ्टीमध्येही मोठी वाढ झालीये. निफ्टीत 800 हून अधिक अंकांची वाढ झालीये.
आकडेवारी
सेन्सेक्समध्ये निर्देशांक 76 हजारांच्या पुढे गेलाय आणि 2,621.98 अंकांची वाढ झालीयेत. तर निफ्टीमध्येही 807.20 अंकांची वाढ झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे निफ्टी निर्देशांक 23,337 पर्यंत पोहचला आहे.
सोमवारी सकाळी शेअर मार्केट उघडताच गुंतवणूकादांरांची 15.40 लाख कोटींची कमाई झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये 3 टक्क्यांची जास्त वाढ झालीये. तर अडानींच्या शेअरमध्येही वाढ झाली आहे. यासह टाटा ग्रुपच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे.
1 जून रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी एक्सिट पोल जाहीर झाले होते. या एक्सिट पोलमध्ये एनडीएची आघाडी दिसली. त्यानुसार उद्याचा निकाल दिसल्यास शेअर बाजारात आणखी उसळी मिळालेली दिसण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.