निवडणुकीच्या धामधुमीत शेअर बाजारात उलथापालथ (Stock Market Crash) झाली आहे. सेन्सेक्समध्ये ७०० अंकांनी घसरण झाली आहे, तर टाटाचे शेअर्सही गडगडल्याची माहिती मिळत आहे. मागील आठवड्यात शेअर बाजारामध्ये मोठी उलथापालथ झाली होती. तर या आठवड्याच्या पहिल्या दिवशी (सोमवारी) आज शेअर बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. कारण सेन्सेक्स 700 हून अधिक अंकांनी घसरत असल्याची माहिती मिळत आहे.
देशात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान सुरू आहे. तर दुसरीकडे बाजार उघडताच मुंबई शेअर बाजारात ३० शेअर्सचा सेन्सेक्स ७०० अंकांनी घसरला आहे. राष्ट्रीय शेअर बाजार एक्स्चेंज (Sensex Fall) निफ्टीही कोसळल्याचं दिसत आहे. मागील आठवड्यात देखील शेअर बाजारात मोठी गोंधळ पाहायला मिळाला होता. याशिवाय टाटा स्टील आणि जेएसडब्ल्यु स्टीलच्या शेअर्मध्ये देखील मोठी घसरण झाली आहे.
आज सकाळी शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात लाल रंगाने झाली होती. बीएसई सेन्सेक्स २३९.१६ अंकांनी घसरला . तो ७२,४२५ अंकावर उघडला होता. शुक्रवारी तो ७२,६६४.४७ वर बंद झाला (Share Market News) होता. व्यापाराच्या अवघ्या ५ मिनिटांच्या कालावधीत ही तीव्र घसरण झाली होती. तर बीएसई सेन्सेक्स ७४३.६० अंकांनी घसरत ७१, ९८१. ८७ च्या पातळीवर व्यवहार करत होता.
सेन्सेक्सप्रमाणेच शेअर बाजाराचा दुसरा निर्देशांक निफ्टी देखील शंभरहून अधिक अंकांनी घसरला आहे. निफ्टीचा २१,९९६.५० च्या पातळीवर व्यापार सुरू झाला होता. तो ५८. ७० अंकांनी घसरला ( Nifty Trade In Red Mark) आहे. टाटाचे देखील दोन शेअर्स कोसळले आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या ३० कंपन्यांपैकी २७ कंपन्यांतील शेअर्समध्ये घसरण झाली आहे. टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये सर्वात मोठी घसरण झाली आहे. टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये जवळपास ७ टक्क्यांनी घसरण झाल्याची माहिती मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.