Share Market: एक्झिट पोलच्या अंदाजानंतर शेअर मार्केट गडगडणार की उसळणार? वाचा सविस्तर

Exit Poll Impact On Share Market: लोकसभा निवडणूकीचा निकाल आल्यानंतर शेअर मार्केटमध्ये मोठे बदल होणार आहेत. एक्झिट पोलच्या अंदाजाचा शेअर मार्केटवर काय परिणाम होईल, ते पाहू या.
शेअर मार्केट
Exit Poll Impact On Share MarketSaam Tv

देशात ४ जून रोजी लोकसभा निवडणूकीचा निकाल येणार आहे. त्याअगोदर एक्झिट पोल समोर येत आहेत. त्याचा शेअर मार्केटवर काय परिणाम होईल, ते आपण पाहू या. एक्झिट पोलमध्ये दिलेल्या अंदाजांचे शेअर मार्केटवर सकारात्मक परिणामाचं भाकित तज्ञांनी केलं आहे. त्याचा परिणाम सोमवारी शेअर्स आणि निर्देशांकांवर दिसून येईल आणि चांगल्या नफ्याची नोंद होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

विविध एक्झिट पोलमध्ये भाजप आणि एनडीएला प्रचंड बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शेअर मार्केटमधील (Share Market) अभ्यासकांनी भाजपचा विजय शेअर बाजारासाठी हिरवा असल्याचं म्हटलं आहे. गुंतवणूकदार सुशील केडिया यांनी एक्झिट पोलच्या निकालांच्या आधारे उद्या शेअर बाजारात 'तेजी' होण्याची शक्यता वर्तवली आहे, अशी माहिती न्युज १८ च्या हवाल्यानुसार मिळत आहे. एक्झिट पोलनुसार, एनडीए आघाडीला सुमारे ३५५ ते ३७० जागा मिळतील, तर भाजपला सुमारे ३०० ते ३१५ जागा मिळण्याची शक्यता (Exit Poll Impact On Share Market) आहे.

एक्झिट पोलच्या अंदाजांचा परिणाम सोमवारी शेअर्स आणि निर्देशांकांवर दिसून येणार आहे. समभागांमध्ये एका आठवड्यात २० टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज वर्तविला आहे. मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, शेअर मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण असणार (Stock Market News) आहे. शेअर बाजारात काही प्रमाणात शॉर्ट कव्हरिंग दिसून येईल. त्यानंतर पुढील ४ ते ५ दिवसांत परिस्थिती सामान्य होईल, असा अंदाज तज्ञांनी वर्तविला आहे.

शेअर मार्केट
Share Market: लोकसभेच्या निकालावर ठरणार शेअर मार्केटचं गणित; बाजार गडगडणार की उसळणार?

शेअर बाजारात गुंतवणूक करण्याअगोदर तज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. एनडीए तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास शेअर बाजारात मोठी तेजी येईल, असे भाकीत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. एनडीए सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरल्यास, शेअर बाजार २० टक्क्यांहून अधिक घसरण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. स्टॉक ब्रोकिंग कंपनीचे तज्ज्ञ अमनीश अग्रवाल यांनी सांगितलंय (Lok Sabha 2024 Result) की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार पुन्हा सत्तेत आल्यास तर इन्फ्रा ते टेक क्षेत्रापर्यंतचे स्टॉक वेगाने वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती आज तकच्या हवाल्यानुसार मिळत आहे.

शेअर मार्केट
Share Market Today : महिन्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार बहरला, सेन्सेक्स-निफ्टीत मोठी उसळी; गुंतवणूकदार सुखावले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com