Share Market Today : महिन्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार बहरला, सेन्सेक्स-निफ्टीत मोठी उसळी; गुंतवणूकदार सुखावले

Share Market Latest News Today : मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी उसळी आली. ज्यामुळे गुंतवणूकदार सुखावले.
महिन्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार बहरला, सेन्सेक्स-निफ्टीत मोठी उसळी; गुंतवणूकदार सुखावले
Share MarketSaam Digital

सलग ५ दिवसांच्या घसरीनंतर मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर्स बाजारात बहार आली. मार्केट उघडताच सेन्सेक्स-निफ्टीने मोठी उसळी घेतली. शुक्रवारी व्यवहाराची सुरुवातीलाच सेन्सेक्स ५०० अंकांनी वाढला.

निफ्टीनेही या काळात पुन्हा एकदा २२६०० अंकांची पातळी ओलांडली. त्यामुळे सेन्सेक्स २१२.१२ (०.२८%) अंकांच्या वाढीसह ७४,०९७.७२ च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला. तर NSE निफ्टी ५१.८० (०.२३%) च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला.

महिन्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार बहरला, सेन्सेक्स-निफ्टीत मोठी उसळी; गुंतवणूकदार सुखावले
YES Bank: येस बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर; एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर

सुरुवातीच्या व्यापारात, अपोलो हॉस्पिटलचे शेअर्स ३ टक्क्यांनी वाढले. तर झोमॅटोच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांची घट झाली. देशातील लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी १ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे.

तत्पूर्वी, शेअर बाजारात मोठी चढउतार होत आहे. निवडणूक निकालापूर्वी गुंतवणूकदार मोठी गुंतवणूक करण्यात सावधगिरी बाळगत आहेत. या आठवड्यात सलग ५ दिवस शेअर बाजारात कुमकुवता दिसून आली.

मात्र, आठवड्याच्या आणि महिन्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार वधारला आहे. दरम्यान, भारताच्या चौथ्या तिमाहीतील जीडीपीचे आकडेवारीही शुक्रवारी जाहीर होणार आहेत, त्यावरही बाजाराची नजर असणार आहे. मागील तिमाहीच्या तुलनेत चौथ्या तिमाहीत आर्थिक वाढ मंद राहण्याची अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

आज कोणकोणते शेअर्स वाढले?

सेन्सेक्स समभागांमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, एल अँड टी, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, सन फार्मा आणि इंडसइंड बँक वाढीसह उघडले. दुसरीकडे, मारुती सुझुकी आणि इन्फोसिसचे समभाग घसरणीसह उघडले.

ओपोला हॉस्पिटल्सच्या शेअर्समध्ये 3% ची उसळी दिसून आली. कंपनीने मार्च २०२४ तिमाहीत तिच्या एकत्रित निव्वळ नफ्यात ७७ टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा तब्बल २५८ कोटी इतका होता.

महिन्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार बहरला, सेन्सेक्स-निफ्टीत मोठी उसळी; गुंतवणूकदार सुखावले
Petrol Diesel Rate Today: पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर; घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com