YES Bank: येस बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर; एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर

Yes Bank FD Interest Rate: येस बँकेच्या एफडीवरील व्याजदर वाढवण्यात आले आहे. ३० मे २०२४ पासून हे व्याजदर लागू करण्यात आले आहे.
YES Bank
YES BankGoogle

येस बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. खाजगी क्षेत्रातील येस बँकेने एफडीवरील व्याजदर वाढवले आहे. एफडीवरील व्याजदर वाढवल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. बँकेने २ कोटी रुपयांपेक्षा कमी कालावधीतील एफडीवरील व्याजदर वाढवले आहे. ३० मे २०२४ पासून हे नवीन दर लागू केले आहेत.

बँकेने एफडीवरील नवीन व्याजदर जाहीर केले आहेत. येस बँक आता सर्वसामान्य नागरिकांना ३.५ टक्के ते ७.७५ टक्के व्याजदर देणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना ३.७५ ते ८.५ टक्के व्याजदर देणार आहे. सात दिवस ते १० वर्ष या कालावधींसाठी जी एफडी आहे. त्यावर हे व्याजदर लागू होणार आहेत.

येस बँकेचे नवीन व्याजदर

७ दिवस ते १४ दिवस- सर्वसामान्यांसाठी ३.२५ टक्के व्याजदर तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ३.७५ टक्के व्याजदर

१५ ते ४५ दिवस - सामान्य नागरिकांसाठी ३.७० टक्के व्याज तर ज्येष्ठ नागरिकांना ४.२० टक्के व्याज

४६ ते ९० दिवस- सर्वसामान्यांलाठी ४.१० टक्के व्याज तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ४.६० टक्के व्याज

९१ ते १२० दिवस- या कालावधीतील एफडीवर ४.७५ टक्के व्याजदर तर ज्येष्ठ नागरिकांना ५.२५ टक्के व्याज देण्यात येणार आहे.

१२१ दिवस ते १८० दिवस- या काळात मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर ५ टक्के व्याजदर तर ज्येष्ठ नागरिकांना ५.५० टक्के व्याज देण्यात आले आहे.

१८१ दिवस ते २७१ दिवस- सामान्य नागरिकांसाठी ६.१० टक्के व्याजदर तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ६.६० टक्के व्याजदर देण्यात येत आहे.

YES Bank
Petrol Diesel Rate Today: पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर; घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

२७१ दिवस ते १ वर्षांपेक्षा कमी दिवस- सर्वसामान्यांसठी ६.३५ टक्के व्याजदर तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ६.८५ टक्के व्याजर देण्यात येणार आहे.

१ वर्ष- सर्वसामान्यांसाठी ७.२५ टक्के तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.७५ टक्के व्याजदर देण्यात येणार आहे.

१ वर्ष ते १८ महिने- सामान्य नागरिकांसाठी ७.२५ टक्के व्याजदर तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.७५ टक्के व्याजदर

YES Bank
Vivoचा स्वस्त ५जी मोबाईल लाँच; 50 MP कॅमेरा आणि 6000 mAh बॅटरी, जाणून घ्या किंमत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com