आजकाल सर्वांना आपल्या भविष्याची काळजी असते. आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. त्यात अनेक लोक एफडीमध्ये गुंतवणूक करतात. स्टेट बँकेने आता आपल्या ग्राहकांना एक खुशखबर दिली आहे. बँकेच्या एफडीवरील व्याजदरात बदल करण्यात आले आहे. स्टेट बँकेचे एफडीवरील व्याजदर वाढवण्यात आले आहेत. हे नवीन व्याजदर १५ मे २०२४ पासून लागू करण्यात आले आहे.
एसबीआयने २ कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात ०.७५ टक्के वाढ केली आहे. याआधी एफडीवर तुम्हाला ५ टक्के व्याज मिळत होते. ते वाढवून ५.७५ टक्के करण्यात आले आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांना ७ दिवसांचीदेखील एफडी ऑफर करतात. वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळे व्याजदर दिले जाते. वरिष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांपेक्षा ०.५० टक्के जास्त व्याज मिळते. एसबीआयचे एफडीवरील व्याजदर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
एफडीवरील व्याजदर
७ दिवसांच्या एफडीवर सामान्य लोकांना ३.५ टक्के व्याजदर आहे तर ज्येष्ठ नागिरकांना ४ टक्के व्याज आहे.
४६ ते १७९ दिवसांच्या एफडीवर सामान्य लोकांना ४.७५ टक्के व्याजदर होते. तेच वाढवून ५.५ टक्के करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ६ टक्के व्याजदर लागू आहे.
१८० ते २१० दिवसांच्या एफडीवर ५.७५ टक्के व्याजदर होते. हेच व्याजदर आता ६ टक्के मिळणार आहे. वरिष्ठ नागरिकांसाठी ६.५ टक्के व्याजदर आहे.
२११ दिवस ते १ वर्षांपर्यंतच्या एफडीवर ६ टक्के व्याजदर मिळत होते. ते व्याजदर आता ६.२५ टक्के झाले आहे. ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर ६.२५ टक्के व्याज मिळते.
१ वर्षांपासून ते २ वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी व्याजदर ६.८ टक्के आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर ७.३ टक्के आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.