Ambernath Shiva Temple: अंबरनाथमध्ये पावसाने तोडले सर्व रेकॉर्ड; १००० वर्षे जुन्या शिवमंदिरात शिरलं पाणी, पाहा VIDEO

Ambernath Valdhuni River Flood: अंबरनाथमधील वालधुनी नदीला पूर आला आहे. पूराचे पाणी अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराचा गाभाऱ्यात साचलं आहे. भगवान भोलेनाथाचा मुखवटा गाभाऱ्याच्या बाहेर आणण्यात आला आहे.

मुंबई शहर उपनगरासह ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये मुसळधार पाऊस (Rainfall) पडत आहे. या पावसामुळे कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूरमधील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीकाठच्या परिसरामध्ये पाणी शिरले आहे. अशामध्ये अंबरनाथमधील वालधुनी नदीला पूर आला आहे. पूराचे पाणी अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराचा (Ambernath Shiv Temple) गाभाऱ्यात साचलं आहे. भगवान भोलेनाथाचा मुखवटा गाभाऱ्याच्या बाहेर आणण्यात आला आहे. वालधुनी नदीला पूर आल्यामुळे भगवान महादेवाला जलाभिषेक करण्यात आला आहे. अशामध्ये महादेवाच्या पाया पडण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.

अंबरनाथमधील १००० वर्षे जुन्या प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात पाणी साचले आहे. मंदिराच्या बाजूने वाहणाऱ्या वालधुनी नदीला पूर आल्यामुळे गाभाऱ्यात गुडघाभर पाणी साचलं आहे. त्यामुळे भगवान भोलेनाथाला जलाभिषेक झाला आहे. प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरल्यामुळे भाविकांसाठी गाभारा बंद करण्यात आला असून गाभाऱ्यातील भगवान भोलेनाथाचा मुखवटा गाभाऱ्याच्या बाहेर काढून ठेवण्यात आला आहे. या मुखवट्याचं दर्शन आणि पूजा सध्या भाविक करत आहेत.

शिव मंदिरामधील पाणी ओसरेपर्यंत कुणालाही गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार नसल्याचं पुजाऱ्यांनी सांगितलं आहे. दरवर्षी मोठा पाऊस झाल्यानंतर वालधुनी नदीचा प्रवाह वाढतो. या नदीचे पाणी थेट शिव मंदिरातील गाभाऱ्यामध्ये येते. वालधुनी नदीचे पाणी शिव मंदिराच्या गाभाऱ्यात साचून भगवान भोलेनाथाला जलाभिषेक होत असतो. यावेळी भोलेनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com