आठवड्याच्या पाचव्या दिवशी म्हणजेच गुरुवारी स्थानिक शेअर मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे गुंतवणूकदारांना फारसा फाया झाला नाही. अर्थसंकल्पात सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेनवर कर (Short Term Capital Gain) वाढवण्याची घोषणा केली. त्यामुळे गुंतवणूकदार या कंपन्यांमध्ये आपली गुंतवणूक करत नाही आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII)ने भारतीय शेअर मार्केटमध्ये जास्त गुंतवणूक करत नाही आहेत.
काल बीएसईचा ३० शेअर्स असलेला सेन्सेक्स १०९.०८ अंकावर बंद झाला आहे. बीएसईच्या शेअर्समध्ये ०.१४ टक्क्यांची घसरण झाली असून तो ८०,०३९.८० अंकावर बंद झाला होता. तर नॅशन स्टॉक्स एक्सचेंज निफ्टीमध्येही ७.४० अंकाची घसरण झाली होती. जवळपास ०.०३ टक्क्यांनी ही घसरण झाली असून २४,४०६ अंकावर बंद झाला होता.
सेन्सेक्स शेअर्समध्ये अॅक्सिस बँक, नेस्टेले (Nestle), टायटन, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, इंडसइंड बँक, आयटीसी, जेएसडब्ल्यू स्टील, स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये सहा टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली. लार्सन अँड टुर्बो, सन फार्मा, कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स आणि पॉवर ग्रिडचे शेअर्स तेजीत होते.
या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.
मोमोंट इंजिकेटर मूविंग कन्वर्जेंस डिवजेंस (MACD)ने Sky Gold, AstraZeneca Pharma, DOMS Industries,Ethos, LTTS,Epigral या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. त्यामुळे या शेअर्समध्ये आज वाढ होऊ शकते.
या शेअर्समध्ये मंदीची चिन्हे
MACD ने CAMS, Apollo Hospitals Enterprise, RVNL, सुप्रीम पेट्रोकेम, मेट्रो ब्रँड्स आणि इमामी या कंपनीच्या शेअर्समध्ये मंदी होऊ शकते, असे संकेत दिले आहेत. या शेअर्समध्ये सध्या घसरण सुरु आहे.
या शेअर्समध्ये खरेदी वाढली
MMTC, ज्योतील लॅब्स, टाटा मोटर्स, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट, ओएनजीसी, युनायटेड स्पिरिट्स या कंपन्यांमध्ये शेअर्समध्ये खरेदी वाढली आहे. या कंपन्यांमध्ये गेल्या ५२ आठवड्यांपासून तेजी सुरु आहे.
नोंद - शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. या व्यवहारात फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.