Share Market Today : बजेटच्या दुसऱ्या दिवशीही शेअर मार्केटमध्ये पडझड; सेन्सेक्स पुन्हा आपटला, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?

Share Market Today : बजेटच्या दुसऱ्या दिवशीही शेअर मार्केटमध्ये पडझड पाहायला मिळत आहे. आज बुधवारी सेन्सेक्स पुन्हा आपटला. कोणत्या शेअर्समध्ये घसरण? जाणून घ्या.
share market
Share Market On Loksabha Election ResultSaam TV
Published On

नवी दिल्ली : बजेटच्या दुसऱ्या दिवशीही शेअर बाजारावर परिणाम पाहायला मिळाला. शेअर बाजार सुरु झाल्यानंतर सेन्सेक्स १०० अंकांनी घसरला. तर निफ्टी ३० अंकांनी आपटला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला बजेट सादर केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सातव्यांदा बजेट सादर केलं. यावेळी निर्मला सीतारामन यांनी विविध घोषणा केल्या. तर काही घोषणांचा थेट शेअर बाजारांवर परिणाम झाला.

अर्थसंकल्पाचा परिणाम बुधवारी देखील शेअर बाजारावर पाहायला मिळाला. शेअर बाजारात दुपारी १२ वाजता सेन्सेक्स ६५० अंकांनी घसरला. त्यानंतर सेन्सेक्स घसरून ७९,७५० अंकावर पोहोचला. तर निफ्टी १७० अंकांनी घसरून २४,३०० अंकापर्यंत पोहोचला.

अनेक शेअर्समध्ये घसरण

कॅपिटल गेन्स टॅक्समुळे शेअर बाजारात पडझड पाहायाला मिळाली. अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजारात अनेक शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्समध्ये १२०० अंकांनी घसरण झाली. तर एनएसईच्या निफ्टीमध्ये ५०० अंकांनी घसरण पाहायला मिळाली. दिवसाच्या अखेर सेन्सेक्स आणि निफ्टी काही प्रमाणात सावरला.

शेअर बाजाराच्या दिवशी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. आज देखील बाजारात गुंतवणूकदारांचे चेहरे पडलेले पाहायला मिळाले. बुधवारी शेअर बाजारातील दोन्ही इंडेक्स लाल रंगात ओपन झाले. अर्थसंकल्पाच्या दिवशी बीएसई सेन्सेक्स ८०,३४३.२८ वर बंद झाला. तर एनएसई निफ्टी २४,४४४ वर सुरु झाला.

शेअर बाजारात चढ-उतार

बुधवारी सेन्सेक्स-निफ्टी चढ-उतार पाहायला मिळाले. आज दिवसाच्या सुरुवातील काही मिनिटांत शेअर बाजारातील व्यवहार ग्रीन झोनमध्ये दिसले. त्यानंतर व्यवहार रेड झोनमध्ये सुरु झाला. आज सकाळी १०.४८ वाजता सेन्सेक्स २०० अंकांनी घसरून ८०,२५० अंकावर पोहाचला. तर निफ्टी ४५ अंकांनी घसरून २४,४३५ अंकावर पोहोचला.

कोणत्या शेअरमध्ये घसरण?

शेअर बाजारात १० शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. यामध्ये लार्जकॅप कंपन्यांचाही समावेश आहे. यामध्ये एँजल वन २ टक्के, ब्लूस्टार १.५ टक्के, इंडसटॉवर ३ टक्के, बंधन बँक २ टक्के, डाबर इंडिया ३.३ टक्के, गोदरेज कंज्यूमर ३.३ टक्क्यांनी शेअर घसरले. तसेच मिडकॅपमध्ये टोरेंट फार्मा ३.१७ टक्के, MPHasis शेअर २.६२ टक्क्यांनी घसरला. तर स्मॉल कंपन्यांमध्ये VSTIND शेअर ७.११ टक्के आणि Phonix इंडिया शेअरमध्ये ४.२० टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com