Union Budget 2024 : मुकेश अंबानींना झटका, अदानींचा फायदा; अर्थसंकल्पाचा अब्जाधिशांवर काय परिणाम झाला?

Mukesh ambani and gautam adani : अर्थसंकल्पानंतर मुकेश अंबानींना झटका बसला. तर गौतम अदानींना फायदा झाला. या अर्थसंकल्पानंतर अब्जाधिशांवर काय परिणाम झाला? वाचा सविस्तर
Union Budget 2024 : मुकेश अंबानींना झटका, अदानींचा फायदा; अर्थसंकल्पाचा अब्जाधिशांवर काय परिणाम झाला?
Union Budget 2024SSaam tv
Published On

नवी दिल्ली : अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळाले. या अर्थसंकल्पाचा भारतातील अब्जाधिशांवरही परिणाम झाला. सेन्सेक्समधील लिस्टेट कंपन्यांमध्ये लार्सन एंड टुब्रो, बजाज फायनान्स, पॉवर ग्रिड, रिलायन्स इंडस्ट्रीज, स्टेट बँक ऑफ इंडिया, बजाज फिनसर्व्ह या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. याचा परिणाम या कंपनीच्या गुंतणणूकदारासहित त्यांच्या मालकांवरही झाला. तर काही शेअरमध्ये उसळी पाहायला मिळाल्याने त्या कंपनीचे मालकही मालामाल झाले.

ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सच्या ताज्या माहितीनुसार, टॉप-१० अब्जाधिशांच्या संपत्तीत मंगळवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. तर अर्थसंकल्पाच्या दिवशी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांना मोठा झटका बसला. आरआयएलच्या शेअरमध्ये घसरण झाल्याने त्यांची संपत्ती १.१० अब्ज डॉलरने कमी होऊन ११२ अब्ज डॉलर झाली.

Union Budget 2024 : मुकेश अंबानींना झटका, अदानींचा फायदा; अर्थसंकल्पाचा अब्जाधिशांवर काय परिणाम झाला?
Union Budget 2024 : अर्थसंकल्पात युवकांसाठी मोठी घोषणा; तरुणांना दर महिन्याला ५००० रुपये मिळणार, वाचा सविस्तर योजना

उद्योजक अजीम प्रेम यांचंही नुकसान झालं. विप्रोच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे त्यांचं नेटवर्थ १२३ मिलियन डॉलरने कमी होऊन २८.४ अब्ज डॉलर झाली. तसेच कुमार बिडला यांनाही २०० मिलियन डॉलरचा झटका बसला. त्यांची एकूण संपत्ती आता २२.२ अब्ज डॉलर इतकी आहे.

बजेटनंतर काही अब्जाधिशांना फायदा

अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांच्या संपत्तीत मंगळवारी ७५१ मिलियन डॉलरने वाढ ढाली. त्यांचं नेटवर्थ १०२ अब्ज डॉलर इतकं झालं. शापूर मिस्त्री यांच्या संपत्तीत २१९ मिलियन डॉलरने वाढ झाली. त्यांचं नेटवर्थ ४०.५० अब्ज डॉलर इतकं झालं. शिव नादार यांच्या संपत्तीत ४०९ मिलियन डॉलरने वाढ झाली. त्यांचं नेटवर्थ आता ३७.२ अब्ज डॉलर झालं आहे.

Union Budget 2024 : मुकेश अंबानींना झटका, अदानींचा फायदा; अर्थसंकल्पाचा अब्जाधिशांवर काय परिणाम झाला?
Union Budget 2024: भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढतेय, महागाई पूर्णत: नियंत्रणात; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती

जेएसडब्लू स्टीलचे मालक सावित्री जिंदल यांच्या संपत्तीत १०.५ मिलियन डॉलरने वाढ ढाली. त्यांचं नेटवर्थ ३३.७ इतकं झालं. दिलीप सांघवी यांच्या संपत्तीत २६४ मिलियन डॉलरने वाढ झाली. त्यामुळे त्यांचं नेटवर्थ ३३.७ अब्ज डॉलर इतकं झालं. राधाकृष्ण दमानी यांनाही २३४ मिलियन डॉलरचा फायदा झाला. त्यामुळे त्यांची संपत्ती २४ अब्ज डॉलर इतकी झाली. तर सुनील मित्तल यांच्या संपत्तीत ४ मिलियन डॉलरने वाढून २३.२ अब्ज डॉलर झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com