Union Budget 2024 : अर्थसंकल्पात युवकांसाठी मोठी घोषणा; तरुणांना दर महिन्याला ५००० रुपये मिळणार, वाचा सविस्तर योजना

Union Budget 2024 : अर्थसंकल्पात युवकांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात तरुणांना दर महिन्याला ५००० रुपये मिळणार आहे. वाचा सविस्तर योजना
 अर्थसंकल्पात युवकांसाठी मोठी घोषणा; तरुणांना दर महिन्याला ५००० रुपये मिळणार, वाचा सविस्तर योजना
Union Budget 2024 Saam tv
Published On

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकरी, तरुण आणि महिलांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं. रोजगारांपासून शेतीपर्यंत मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला. यादरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात युवकांसाठी मोठी घोषणा केली. तसेच त्यांनी यावेळी १ कोटी तरुणांसाठी मोठी खूशखबरी दिली.

अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारामन यांनी देशाच्या टॉप कंपन्यांमध्ये युवकांना ट्रेनिंग दिली जाईल. या ट्रेनिंगदरम्यान, युवकांना ५००० रुपये मासिक भत्ता दिला जाणार आहे. हा मासिक भत्ता प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत १२ महिन्यांसाठी असणार आहे. तरुणांना १२ महिन्यांपर्यंत तरुणांना इंटर्नशिपचा फायदा घेता येता येणार आहे. या योजनेअंतर्गत देशातील टॉप कंपन्यांकडून पुढील पाच वर्षांत १ कोटी तरुणांना ट्रेनिंग दिली जाणार आहे.

 अर्थसंकल्पात युवकांसाठी मोठी घोषणा; तरुणांना दर महिन्याला ५००० रुपये मिळणार, वाचा सविस्तर योजना
Budget 2024 Housing Sector: खुशखबर! आता सर्वसामान्यांना मिळणार हक्काचं घर; 3 कोटी नागरिकांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा

१२ महिन्यांसाठी असणार ट्रेनिंग

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना फक्त १२ महिन्यांसाठी असणार आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना सरकारकडून ५००० रुपये मानधन मिळणार आहे. या योजनेचा कोणताही युवक लाभ घेऊ शकतो. या योजनेमुळे १ कोटी युवांना लाभ मिळणार आहे.

 अर्थसंकल्पात युवकांसाठी मोठी घोषणा; तरुणांना दर महिन्याला ५००० रुपये मिळणार, वाचा सविस्तर योजना
Budget 2024 News : तीन लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही, अर्थमंत्र्यांची घोषणा

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी टॅक्स स्लॅबमध्ये बदल केले आहेत. वर्षाला १५ लाख रुपयांची कमाई करणाऱ्यांना २० टक्के टॅक्स भरावा लागणार आहे. तर याहून अधिक कमाई करणाऱ्यांना ३० टक्के टॅक्स भरावा लागणार आहे. तसेच सरकारने स्टॅडर्ड डिडक्शन देखील वाढवलं आहे. आता स्टॅडर्ड डिडक्शनला ५० हजार वार्षिकच्या ऐवजी ७५००० रुपये वार्षिक करण्यात आली आहे.

या सत्ताधारी नेत्यांनी बजेटला पाठिंबा दर्शवला आहे. अनेकांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं अभिनंदन केलं आहे. तर विरोधकांनी अर्थसंकल्पावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com