नॅशनल पेन्शन सिस्टीम ही केंद्र सरकारची पेन्शन योजना आहे. यात सेवानिवृत्तीचं वय लक्षात घेऊन गुंतवणूक केली जाते. 18 ते 70 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक (सरकारी कर्मचारी किंवा खाजगी क्षेत्रातील कर्मचारी) राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये खाते उघडू शकतो. नॅशनल पेन्शन सिस्टीम ही एक सेवानिवृत्ती म्हणजेच रिटायरमेंटसाठी तयार केलेली योजना आहे. यात तुम्ही नोकरीत रुजू होताच गुंतवणूक करण्याचा प्लान केला तर तुमचं म्हातारपण आनंदात जाईल.
कमी वयापासून तुम्ही महिन्याला बचत करत या योजनेत नियमितपणे गुंतवणूक केली, तर निवृत्तीनंतर चांगला परतावा निधी मिळेलच त्याशिवाय दर महिन्याला चांगली पेन्शनही मिळू शकते.फक्त दररोज शंभर रुपयांची बचत केली तरी तुम्ही निवृत्तीनंतर तब्बल 40 लाख रुपयांचा फंड मिळवू शकतात.
गुंतवणूक सुरू करण्याचे वय: 25 वर्षे
NPS मध्ये दरमहा गुंतवणूक: रु. 3000
35 वर्षांत एकूण गुंतवणूक: रु 12,60,000 (रु. 12.60 लाख)
गुंतवणुकीवर अंदाजे परतावा: 10 टक्के प्रतिवर्ष
एकूण निधी: रु 1,14,84,831 (रु. 1.15 कोटी)
एन्युटी योजनेत गुंतवणूक: 65 टक्के
एकरकमी (लम्प सम) रक्कम: रुपये 40,19,691 (40.20 लाख कोटी)
पेन्शनपात्र रक्कम: रु 74,65,140 (रु. 74.65 लाख)
वार्षिकी परतावा: 8 टक्के
मासिक पेन्शन: रुपये 49,768 (सुमारे 50 हजार रुपये)
किती परतावा मिळू शकेल?
NPS मध्ये जमा केलेल्या रकमेचा एक भाग इक्विटीमध्ये गुंतवला जातो, त्यामुळे तुम्हाला या योजनेत खात्रीशीर परतावा मिळू शकत नाही. परंतु PPF सारख्या इतर पारंपारिक दीर्घकालीन गुंतवणुकीपेक्षा जास्त येथे परतावा जास्तीचाच मिळत असतो. जर NPS चा परताव्याचा इतिहास पाहिला तर आत्तापर्यंत त्याने 9% ते 12% वार्षिक परतावा मिळालाय. NPS मध्ये जर तुम्ही फंडाच्या कामगिरीवर समाधानी नसाल तर तुम्हाला तुमचा गुंतवणुकीचा फंड बदलू शकतात.
निवृत्तीनंतर पैसे काढण्याचे नियम
सध्या कोणीही एकरकमी म्हणून एकूण कॉर्पसपैकी 60 टक्के रक्कम काढू शकतो. तर उर्वरित 40 टक्के वार्षिकी योजनेत जातात. नवीन NPS मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एकूण निधी 5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असल्यास, ग्राहक वार्षिक योजना खरेदी न करता संपूर्ण रक्कम काढू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.