LIC Scheme: जबरदस्त आहे LIC ची ही योजना, एकदा गुंतवणूक केल्यास आयुष्यभर दरमहा मिळणार 12,000 रुपये पेन्शन

LIC Saral Pension Plan: एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेत एकदाच गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरमहा 12,000 रुपये पेन्शन मिळेल. याच योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ...
जबरदस्त आहे LIC ची ही योजना, एकदा गुंतवणूक केल्यास आयुष्यभर दरमहा मिळणार 12,000 रुपये पेन्शन
LIC Saral Pension PlanSaam Tv
Published On

निवृत्तीनंतरच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या आर्थिक समस्या समोर येऊ शकतात. यातच तुम्हाला तुमचे भविष्य सुरक्षित करायचे असेल, तर आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या एका जबरदस्त योजनेबद्दल सांगणार आहोत. एलआयसीच्या या योजनेचे नाव सरल पेन्शन योजना आहे. या योजनेची सर्वात खास गोष्ट म्हणजे यात फक्त एकदाच गुंतवणूक करून तुम्ही आयुष्यभर पेन्शनचा लाभ घेऊ शकता.

या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या बाजारातील जोखमीचा सामना करावा लागणार नाही. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून ही योजना पूर्णपणे सुरक्षित आहे. एलआयसीच्या या योजनेत एकदा गुंतवणूक करून तुम्ही स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करू शकता. यातच काय आहे एलआयसी सरल पेन्शन योजना, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ...

जबरदस्त आहे LIC ची ही योजना, एकदा गुंतवणूक केल्यास आयुष्यभर दरमहा मिळणार 12,000 रुपये पेन्शन
Ayushman Bharat Yojana: 5 लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणाला मिळू शकतो 'आयुष्मान कार्ड'चा लाभ? जाणून घ्या नियम-अटी

या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमचे वय किमान ४० वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच या योजनेत कमाल वयाच्या 80 वर्षापर्यंत गुंतवणूक करता येते. एलआयसी सरल पेन्शन योजना तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर खरेदी करू शकता.

योजनेची किमान रक्कम तुम्ही खरेदी केलेल्या वार्षिकीच्या आधारे ठरवली जाते. या योजनेतील गुंतवणुकीच्या रकमेबाबत कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. या योजनेत तुम्हाला हवी तेवढी गुंतवणूक करता येईल.

जबरदस्त आहे LIC ची ही योजना, एकदा गुंतवणूक केल्यास आयुष्यभर दरमहा मिळणार 12,000 रुपये पेन्शन
Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजने'चा कोणाला घेता येणार लाभ, काय आहेत नियम-अटी? शासन निर्णयातून समोर आली माहिती

तुम्ही वयाच्या ४२ व्या वर्षी एलआयसीच्या सरल पेन्शन प्लॅनमध्ये ३० लाख रुपये एकत्र गुंतवल्यास, तुम्हाला दरमहा १२,३८० रुपये पेन्शन मिळेल. या पेन्शनचा लाभ तुम्हाला आयुष्यभर मिळेल. तसेच दुर्दैवाने पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला पॉलिसीमध्ये गुंतवलेले संपूर्ण पैसे मिळतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com