Stock Market Prediction : शेअर बाजारात दिवस कसा असेल? कोणते शेअर्स असतील तेजीत?

Stock Market today News : आज शेअर बाजारात दिवस कसा असेल, कोणते शेअर्स असतील तेजीत? सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
शेअर बाजारात दिवस कसा असेल? कोणते शेअर्स असतील तेजीत?
Stock Market HolidaysYandex
Published On

नवी दिल्ली : स्थानिक शेअर बाजारात बुधवारी सलग चौथ्या व्यापारी सत्रात घसरण पाहायला मिळाली. सेक्युरिटी ट्रांजेक्शन टॅक्स आणि शॉर्ट टर्म गेन टॅक्समध्ये वाढ झाल्याने गुंतवणूकदारांचा मूड बिघडला आहे. बीएसईच्या ३० शेअरवाला सेन्सेक्स २८०.१६ अंकांनी म्हणजे ०.३५ टक्क्यांनी घसरून ८०,१४८.८८ अंकावर बंद झाला. व्यवहारावेळी एकदा सेन्सेक्स ६७८.५३ अंकांनी घसरून ७९,७५०.५१ अंकावर घसरला होता. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी ६५.५५ अंकांनी म्हणजे ०.२६ टक्क्यांनी घसरून २४,४१३.५० अंकावर बंद झाला.

बजाज फायनान्स, हिंदुस्तान यूनिलीवर, कोटक महिंद्रा बँक, अदानी पोर्ट्स, एक्सिस बँक आणि भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिाली. तर बजेटदरम्यान तंबाखूच्या उत्पादनांवर कोणताही नवा टॅक्स लावण्यात आला नाही. त्यामुळे आयटीसीचे शेअरने ५२ आठवड्यांतील उच्चांक गाठला.

शेअर बाजारात दिवस कसा असेल? कोणते शेअर्स असतील तेजीत?
Stock Market Scam: एक्झिट पोलचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात; शेअर बाजारातील घसरणीची चौकशी व्हावी, याचिकेतून मागणी

कोणत्या शेअर्समध्ये दिसणार तेजी?

MACDने दिलेल्या माहितीनुसार, व्ही-मार्ट रिटेल, ग्राव्हिटा इंडिया, EMS, जेके सिमेंट, Genesys International Corporation, GlaxoSmithKline Pharmaceuticals या शेअर्समध्ये उसळी पाहयला मिळण्याची शक्यता आहे. तर एमएसीडीच्या ट्रेडेट सिक्युरिटीज किंवा इंडेक्समध्ये ट्रेंड रिव्हर्सलचेही संकेत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. एमएसीडी सिग्नल पार करतो, तेव्हा तेजीचे संकेत मिळतात.

कोणत्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक धोक्याची?

एमएसीडीच्या माहितीनुसार, बजाज होल्डिंग अँड इनव्हेस्टमेन्ट, मॅक्स इस्टेट्स, Awfis Space Solutions, Inox Wind Energy,Neuland Laboratories या शेअरमध्ये घसरण पाहायाला मिळण्याची शक्यता आहे. याचा अर्थ या शेअरमध्ये घसरण सुरु झाली आहे.

दरम्यान, काही शेअरची जोरदार खरेदी सुरु आहे. यात ICICI Prudential Life, MMTC, Avanti Feeds, DOMS Industries,Deepak Fertilisers, Alembic Pharma आणि Piramal Pharma या शेअरचा समावेश आहे. हे शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकांवर पोहोचले आहे. या शेअरमध्येही तेजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

शेअर बाजारात दिवस कसा असेल? कोणते शेअर्स असतील तेजीत?
Small Business Ideas : फक्त विकेंडला करू शकता असे ७ व्यवसाय

नोंद - शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. या व्यवहारात फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com