Stock Market Scam: एक्झिट पोलचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात; शेअर बाजारातील घसरणीची चौकशी व्हावी, याचिकेतून मागणी

Stock Market Crash: 4 जून रोजी शेअर बाजारात अचानक घसरण झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले होते. आता याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
एक्झिट पोलचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात; शेअर बाजारातील घसरणीची चौकशी व्हावी, याचिकेतून मागणी
Exit Poll ScamSaam Tv
Published On

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी 4 जून रोजी शेअर बाजारात अचानक घसरण झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले होते. आता याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये केंद्र सरकार आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांना या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे.

अधिवक्ता विशाल तिवारी यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत सांगण्यात आलं की, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजारात आणखी एक मोठी घसरण पाहायला मिळाली. याचा एक्झिट पोलशी सखोल संबंध आहे आणि त्याची चौकशी व्हायला हवी.https://youtu.be/1nnKcY4JQBU?si=q_XPl922XA4sPrdl

एक्झिट पोलचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात; शेअर बाजारातील घसरणीची चौकशी व्हावी, याचिकेतून मागणी
Pune Rain: अवघ्या काही तासांच्या पावसाने पुण्यात सर्वत्र दाणादान, नागरिकांनी काळजी घ्यावी; अजित पवारांचं आवाहन

याचिकाकर्ते विशाल तिवारी म्हणाले की, 'शेअर मार्केटमध्ये पुन्हा अस्थिरता दिसून आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेअर बाजारातील घसरणीमुळे 20 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे नियामक यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याचिकेत म्हटले आहे की, लोकसभेच्या एक्झिट पोलच्या घोषणेनंतर शेअर बाजारात तेजी आली होती, मात्र प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यानंतर बाजार कोसळला. त्यामुळे नियामक प्राधिकरण आणि त्याच्या यंत्रणेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. याबाबत चौकशी होण्याची गरज आहे.

एक्झिट पोलचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात; शेअर बाजारातील घसरणीची चौकशी व्हावी, याचिकेतून मागणी
Raosaheb Danve: म्हणून राज्यात भाजपला फटका बसला, निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

दरम्यान, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी 6 जून रोजी पत्रकार परिषदेत याबाबत गंभीर आरोप केले होते. त्यांनी दावा केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे देशातील कथित सर्वात मोठ्या शेअर बाजार घोटाळ्यात थेट सहभागी होते. ज्यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचे 30 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. हे गुन्हेगारी कृत्य असल्याचे सांगत त्यांनी संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीची मागणी केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com