ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चला तर पाहूयात सुट्टीच्या दिवशी तुम्ही करु शकता असे सोप्पे आणि सहज व्यवसाय.
जर तुम्ही योगमध्ये योग्य प्रशिक्षण घेतले असाल तर तुम्ही विकेंडला योग क्लासेस घेऊ शकता.
तुम्ही तुमचे रोजचे काम सांभाळता विंकेडच्या दिवशी तुमच्या ओळखीच्या व्यक्तीच्या व्यवसायात भागीदार होऊ शकता.
तुम्हीही विकेंडच्या दिवशी ब्लॉगर होऊ शकता. विविध विषयावर लिखाण करु शकता.
सध्या प्रत्येकजण युट्युब चॅनल चालवत आहे, त्याप्रमाणे तुम्हीही स्वत:चा युट्युब चॅनल चालवू शकता.
विमा सल्लागार होऊन तुम्ही साईट बिजनेस करु शकता. मात्र त्यासाठी तुम्ही आयआरडीएची परिक्षा पास करावी लागेल.
विकेंडच्या दिवशी तुम्ही टुर ऑपरेटर होण्याचाही व्यवसाय करण्याचा विचार करु शकता.
सध्या खाद्य पदार्थांचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो, त्यामुळे तुम्ही फूड स्टॉलही चालवू शकता.