ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बरेच लोक त्यांच्या आयुष्यात खूप कष्ट करतात, परंतु त्यांच्या घरात नेहमीच आर्थिक चणचण राहत असते. त्यांना याचे कारण समजत नाही, मात्र त्यांना यश येत नाही.
दैनंदिन जीवनात आपण जे काही काम करतो त्याचा थेट परिणाम आपल्या जीवनावर होतो. परंतु अशी काही कामे आहेत जे सकाळी केल्यास त्याचा अशुभ परिणाम होत असतो.
वास्तुशास्त्रानुसार, रात्री जेवण केल्यानंतर खरकटी भांडी रात्रभर तशीच ठेवल्याने घरात लक्ष्मी राहत नाही.
सकाळी-सकाळी घरात दाम्पत्यामध्ये वाद होत असेल किंवा भांडण होत असेल तर त्या घरात लक्ष्मी माता नांदत नाही.
हिंदू धर्मानुसार आपण गायीला लक्ष्मी माता मानतो. त्यामुळे सकाळी तुमच्या दारात किंवा अंगणात गाय आली तिला हाकलून देऊन नका. गायीला भाकरी किंवा काही खायाला द्या.
ताटात उरलेले जेवण तसेच सोडून देणं किंवा उरलेले अन्न फेकून दिल्यानं आपल्या घरात दारिद्रय येत असते.
तुळशीला आपण पवित्र मानत असतो. सकाळी-सकाळी तुळशीचे पाने तोडणं हे खूप अशूभ मानलं जातं. तुळशीची पाने तोडल्याने तुम्हाला आर्थिक चणचणीचा सामना करावा लागतो.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.