ITR: ITR भरल्यानंतर तुमच्या खात्यात परताव्याचे पैसे जमा झालेत की नाही? या सोप्या पद्धतीने करा चेक

How To Check Refund Status Of ITR: आयटीआर फाइल केल्यानंतर तुमच्या खात्यात परतावा जमा झाला की नाही हे चेक करण्यासाठी सोपी प्रोसेस असते. ही प्रोसेस वापरुन तुम्ही तुमचा परतावा कधीपर्यंत तुमच्या खात्यात जमा होईल याची माहिती मिळवू शकतात.
ITR
ITRSaam Tv
Published On

प्राप्तिकर विभागाने इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख जाहीर केली आहे. सर्व करदात्यांनी ३१ जुलैपर्यंत आयटीआर भरायचा आहे. अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. जर तुम्ही मुदतीनंतर आयटीआर भरला तर तुम्हाला करावर व्याजदेखील भरावे लागेल. ज्या लोकांना प्राप्तिकर विभागाकडून परतावा मिळण्याची अपेक्षा आहे त्यांनी ३१ जुलैआधी आयटीआर भरावा.

जर तुम्ही मुदतीआधीच आयटीीआर भरला असेल तर तुम्हाला तुमचा परतावा लवकरात लवकरात मिळतो. तुमच्या बँक खात्यात हा परतावा जमा होतो. तुमच्या खात्यात येणाऱ्या रिफंडची स्थिती काय आहे, तुमचा परतावा कधीपर्यंत तुमच्या खात्यात जमा होईल याबबत सर्व माहिती आयकर विभागाच्या वेबसाइटवर दिलेली असते. यासाठी तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर आणि पासवर्ड वापरुन वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.

ITR
ITR : आयटीआर दाखल केल्यानंतर किती दिवसांनी परतावा मिळतो? पैसे न आल्यास काय करावं?

रिफंडची स्थिती कशी तपासावी?

सर्वप्रथम ई- फायलिंग पोर्टलवर लॉग इन करा. त्यानंतर तुम्हाला ई-फाइल टॅबवर क्लिक करावे लागेल. त्यावर तुम्हाला View Field Return हा पर्याय दिसेल. येथे तुम्हाला आवश्यक माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तपशील पाहा वर क्लिक करायचे आहे. तेथे तुम्हाला आयकर परताव्यासंबंधित सर्व माहिती दिसेल. जर तुमचा परतावा जमा झाला असेल तर पेमेंटची पद्धत, परताव्याची रक्कम, क्लिअरन्सची तारीख ही सर्व माहिती मिळेल.

परताव्यामधील काही रक्कम टॅक्समध्ये अॅडजस्ट होऊ शकते.

जर तुम्हाला परतावा चेक करण्याच्या ठिकाणी 'प्रोसेस्ड अँड पार्शियली रिफंड अॅडजस्ट' असं दिसले तर त्याचा अर्थ होतो की, तुमच्या परताव्याचा काही भाग टॅक्समध्ये अॅडजस्ट केला आहे. यावेळी रिफंडची रक्कम आणि क्लिअरन्सची तारीख दिली जाते. याचाच अर्थ तुमच्या परताव्याची काही रक्कम टॅक्समध्ये अॅडजस्ट केली आहे.

ITR
ITR: आयटीआर भरल्यानंतर किती दिवसात मिळतो रिफंड? जाणून घ्या A TO Z माहिती

तुमच्या परताव्याची रक्कम रिजेक्ट होऊ शकते.

काही प्रकरणांमध्ये तुमच्या परताव्याची रक्कम रिजेक्ट होऊ शकते. यामुळे तुमच्या अकाउंटमध्ये परताव्याची रक्कम जमा होत नाही. अशावेळी रिफंड चेक करताना तुम्हाला तुमचा परतावा का रिजेक्ट झाला याची माहिती मिळते. सामान्यतः तुम्ही आयकर नियमांचे पाळन न करता आयटीआर भरला किंवा तुमचे बँक अकाउंट प्री वॅलिडेट नसेल तर रिफंडची प्रोसेस होत नाही.

ITR
Petrol Diesel Rate Today: देशात पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर; मुंबई, पुण्यासह तुमच्या शहरातील आजचा भाव काय? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com